राज्यमंत्री दर्जा विवेक पंडित यांचा कल्याण तालुक्यातील आदीम कातकरी पारधी वाड्या वस्त्यांमध्ये दौरा, अनेक ठिकाणी भेटी नाहीत?
कल्याण, (संजय कांबळे) : देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्ष पुर्तीच्या पुर्व संध्येला विकासापासून तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदीम आदीवासी कातकरी व पारधी समाजासाठी आज अखेर काय काय सोई सुविधा पुरवल्या गेल्या व सध्यस्थितीत आणखी काय उपाययोजना आवश्यक आहे.
याबाबतचा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तातडीने सादर करावयाचा आहे. या अनुषंगाने राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिची, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांचा आज कल्याणात दौरा होता, परंतु या दरम्यान अनेक वाड्या पाड्यात वस्ती ना भेटी न दिल्याने यथील लोकांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यमंत्री दर्जा असलेले विवेक पंडित यांचा आज कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी, कातकरी, व पारधी वस्ती ना भेटी दौरा होता, उद्या शहापूर व मुरबाड तालुका आहे, कल्याण तालुक्यातील खडवली, नडगाव, वाहोली तसेच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील काही भागात त्यांनी भेटी दिल्या व यांना पुरविण्यात येणाऱ्या सोई सुविधा तसेच यामध्ये अजूनही काही सुधारणा करता येईल का? या बाबतीत माहिती घेतली.
परंतु कल्याण तालुक्यात अशी कितीतरी पाडे वस्ती आहेत तेथे हे गेले नाहीत, भोंगालपाडा, वैतागवाडी, घोडाखडक, ठाकूरवाडी, आणेपाडा, पठारपाडा, वाघेरापाडा, नैथरपाडा, नानेपाडा, वरपकातकरी वाडी, रायते कातकरीवाडी, आपटीकातकरी वाडी, बापसई, बेलपाडा, बांगरवाडी भोसोळपाडा अशा कितीतरी वाड्या पाड्यावर गेले नाहीत, आजही या वाड्या वस्तीवर साधा रस्ता नाही, मग इतर सोई सुविधांचा विचारच सोडा? बांगरवाडीचे आदीवासी, कातकरी बांधव आजही रस्त्यासाठी अर्ज विनंती, तक्रारी, अंदोलन करीत आहेत, पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून ये जा करावी लागते, अशीच अवस्था रायतेकातकरी वाडीची इतर वाड्या वस्त्यांचे दु:ख वेगळे नाही, त्यामुळे हा नेमका दौरा कशासाठी व कोणासाठी आयोजित केला होता? असा प्रश्न उपस्थित करून या समितीचे अध्यक्ष विवेक पंडित हे लोकांना भेटले असते त्यांचे समस्या, अडचणी आम्ही त्यांना सांगितल्या असत्या, ते आले, त्यांनी पाहिले अन् गेले, अशी म्हणन्यांची वेळ आली असे रायते येथील सामाजिक कार्यकर्ते राम सुरोशे यांनी मत व्यक्त केले.
या दौऱ्यास कल्याण तहसीलदार दिपक आकडे, गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, प्रकल्प अधिकारी, श्रीमती आर एच किल्लेदार, महिला व बालविकास अधिकारी, चौधरी,मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, श्रमजीवी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, अशोक सापटे, जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, दशरथ भालके, तालुकाध्यक्ष विष्णू वाघे, आदी मान्यवर उपस्थित होते.





No comments:
Post a Comment