Thursday, 5 August 2021

शहापूर मध्ये ४ सप्टेंबर ला कवी संमेलनाचे आयोजन !

शहापूर मध्ये ४ सप्टेंबर ला कवी संमेलनाचे आयोजन !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
        डी. वाय. फाउंडेशन, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ, लोक हिंद वृत्तवाहिनी, साप्ताहिक शिवमार्ग तर्फे जेष्ठ साहित्यिक आधुनिक ओविकार दिवंगत डॉ.दिलीप धानके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रिय भावास ... हे राज्यस्तरीय महा कविसंमेलन शहापूर निसर्गरम्य वातावरणात शनिवार दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आले आहे, दरवर्षी लोक हे कविसंमेलन होत असले तरी गेल्यावर्षी मात्र कोरोना मुळे हे कविसंमेलन होऊ शकले नाही. १४ मे रोजी जेष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप धानके यांचे कोरोना मध्ये अकस्मात निधन झाले असून कवी, लेखक व व्याख्यात्यांची प्रेरणा असणारे दिवंगत आधुनिक ओविकार डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या कवि संमेलनास प्रिय भावास हे नाव देण्यात आले आहे. या संमेलनात कवींनी स्वतःची बंधुप्रेम किंवा भावाचे वर्णन करणारी कविता सादर करायची असून संमेलनात उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन कवींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तर सहभागी सर्व कवींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. फक्त ५० कवींची यात निवड होणार असल्याने ज्या कवींना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी महेश धानके, संपादक मोबाईल 9689995000 / 9049037444 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन डी वाय फाउंडेशन चे अध्यक्ष दयानंद चोरघे, संमेलनाचे निमंत्रक लक्ष्मण घरत, भास्कर जाधव, रामचंद्र जोशी, रवींद्र परटोळे, जितेंद्र भानुशाली, अंकुश भोईर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...