Thursday, 5 August 2021

शिवभिम शाहिर पोपटराव वाघमारे यांचे वृध्पकाळाने निधन, ऐतिहासिक भूमितील कवी हरपला !

शिवभिम शाहिर पोपटराव वाघमारे यांचे वृध्पकाळाने निधन, ऐतिहासिक भूमितील कवी हरपला !


कल्याण, (संजय कांबळे) : अंत्यत गरीब कुंटूबात आणि स्वराजाचे सरसैनापती हंबीरराव मोहिते यांच्या ऐतिहासिक अशा 'तळबीड' या जन्मभूमीत जन्म घेतलेले शिवभिम शाहिर पोपटराव यदू वाघमारे यांचे नुकतेच वृध्पकाळाने दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे ८० वर्षे वय होते,त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रातील एक कणखर आवाजाचा शिवभिम शाहिर हरपला आहे.


सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किल्ले वंसतगडाच्या पायथ्याशी 'तळबीड' हे गाव वसले आहे, या गावाची ओळख म्हणजे, बहुजनप्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सोयराबाई साहेब,यांचे माहेर आणि हिंदवी स्वराज्याचे सशस्त्र सैन्य दलाचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे जन्म गाव अशी असून आजही सरसेनापती यांची समाधी तळबीड येथे आहे !

अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावी एका गरीब कुंटूबात पोपटराव वाघमारे यांचा १९४१ला जन्म झाला, घरी आठराविश्व दारिद्र्य, यामुळे त्यांनी मुंबई गाठली, येथे रेल्वेत नोकरी मिळाली, पण काही वर्षानंतर ती गेली, त्यामुळे आता जगायचे कसे,हा मोठा प्रश्न पडला, पोपटराव लहानपणापासून तल्लख बुध्दीचे, शब्दांवर प्रभुत्व असल्याने ते खडे खडे कवीता, गाणी, पोवाडे लिहित असत, त्यांच्या या गुणामुळे त्यांना लावणी साम्राज्ञी विठाबाई मांग, नारायणगांवकर यांच्या तमाशात काम मिळाले, यानंतर काळूबाळू, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, अशा दिग्गज तमाशात कामे केली, हे सुरु असतानाच त्यांनी गाणी, पोवाडे, लिहायला सुरुवात केली. आजमितीस सुमारे एक हजारांच्या आसपास, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांचे पोवाडे, लोकगिते, समाजप्रबोधन गिते, लिहिले आहेत, परंतू गरीबी आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिल्या ने ती धुळखात पडलेली आहे.

*पत्रकार संजय कांबळे यांच्या कडून दखल -

ऐतिहासिक भूमित जन्मलेले पोपटराव वाघमारे हे गेली ३०/४० वर्षे कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु प्रसिद्धीपासून दूर असल्याचे कुणकुण जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांना लागताच त्यांनी ऐतिहासिक 'तळबीड' भूमित जाऊन सरसेनापती च्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन पोपटराव वाघमारे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी सर्वासमोर सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील गाणें, लोकगिते, आदींनी उपस्थित भारावून गेले, वयाच्या ७५ वर्षी टिपेला जाणारा आवाज, जबरदस्त शब्द फेक, लकब, एक्सप्रेशन, हे अगदी कसलेल्या नटाला लाजवेल असेच होते,त्यामुळे त्यांची काही गाणी, पोवाडे, लोकासमोर आणन्याचा शब्द पत्रकार संजय कांबळे यांनी दिला. व त्यांच्या एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस, या बँनरखाली, शाहिर पोपटराव वाघमारे यांचे, 'तयाला मानाचा मुजरा' हे साँग रेकॉर्डिंग केले,आणि अजूनही काही गाणी करायची बाकी होती तोपर्यंत बुधवारी सांयकाळी ९:३० वाजता या बहुगुणी शिवभिम शाहिरांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृध्पकाळाने निधन झालं, त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी आणि नांतवडे असा मोठा परिवार असून त्यांचा रक्षा विसर्जन चा कार्यक्रम सोमवार दि ९/८/२०२१रोजी बुध्द विहार तळबीड येथे होणार असल्याचे त्यांचा मुलगा दयानंद वाघमारे यांनी कळविले आहे, अशा या शाहिरास पत्रकार संजय कांबळे, व त्यांच्या एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस च्या संपूर्ण टिम तर्फे अखेरचा 'मानाचा मुजरा'.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...