Wednesday, 4 August 2021

समाधानकारक पावसाने पाण्याची चिंता मिटली भातसा धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा !

समाधानकारक पावसाने पाण्याची चिंता मिटली
भातसा धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा !


शहापूर, उमेश जाधव -: गेल्या काही दिवसात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाल्यात जमा आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही ९४२ दशलक्ष घनमीटर आहे. तर आजघडीला ७८० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणात सध्या ७९.१९ टक्के पाण्याचा साठा आहे. 

आतापर्यंत भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १७१२ मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी दिली. यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने सध्याच्या धारणातील पाणीसाठ्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाल्यात जमा झाली आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...