शिव सामर्थ्य सेनेच्या मुंबई अध्यक्ष पदी सिद्धेश मोहिरे यांची नियुक्ती !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिव सामर्थ्य सेनेच्या मुंबई अध्यक्ष पदी सिद्धेश मोहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात युवा वर्ग मोठा असुन त्यास योग्य दिशा देण्याची आणि समर्थ मार्गदर्शनाची गरज आहे यासाठी शिव सामर्थ्य सेनाची स्थापना करण्यात आली आहे संघटनेचे सल्लागार सुरेश पाटील यांच्या देखरेखीखाली नव्या पिढीतील तरुणांना संधी दिली जात आहे. शिव सामर्थ्य सेनेचे सल्लागार सुरेश पाटील यांच्या हस्ते सिद्धेश मोहिरे यांना मुंबई अध्यक्ष पदी नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र अध्यक्ष संदीप भोज आदीसह अन्य पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment