महाराष्ट्र युवा संघटना विरारतर्फे चिपळूणमधील ४०० पूरग्रस्तांना मदत !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
महाराष्ट्र युवा संघटना विरारतर्फे चिपळूणमधील ४०० पूरग्रस्तांना मदत
चिपळूण शहरातील महाप्रलयात जनतेचे हाल व नुकसान झाले होते. त्यामुळे कशाचीही तमा न बाळगता प्रत्यक्ष सेवा कार्यात सहभागी झालेले महाराष्ट्र युवा फाउंडेशन इनर व्हील क्लब ऑफ मुलुंड साटलेवाडी समाजसेवा मंडळ मुबंई व इतर सर्व सहकारी तसेच उद्धवस्त झालेल्या चिपळूण येथील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू ची मदत करण्यात आली. ब्लॅंकेट, टॉवेल, साडी, सॅनिटरी नॅपकिन, साबण, कोलगेट, पिण्याचे पाणी, धान्याचे किट त्यामध्ये तांदूळ, गहू, डाळ, साखर, चहा पावडर इत्यादी सामानाचे वाटप करण्यात आले. संघटनेतर्फे एकूण ४०० कुटुंबांना मदत करण्यात आली.
महापुरामुळे संपूर्ण चिपळूण शहर जलमय झाले व अनेकांचे मोठे नुकसान झाले काहींचा संसार उध्वस्त झाला अशा नागरिकांना आधार देण्यासाठी मदतीचा हात म्हणून जिवनावश्यक वस्तू आणि पिण्याच्या पाण्याचे बॉक्स अगदी ट्रक भर सामान चिपळूणमधील गोवळकोंड आणि कलंबस्ते या गावांमध्ये देण्यात आले यावेळी महाराष्ट्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. निखिल जांभळे, सचिव श्री. विनायक भोसले तसेच साटलेवाडी समाजसेवा मंडळ मुबंईचे अध्यक्ष श्री अशोक साटले, तसेच माझे सहकारी श्री. सत्यन्द्र यादव, श्री. सतिश जांभळे (रत्नागिरी टाइम्स), नितीन जांभळे, सिलन बावकर, प्रकाश, अनिकेत वरपे, प्रणय जाधव, संतोष जाधव, प्रणय (सोपारा), इक्बाल शेख, अशा अनेक तरुण मित्रांनी महाराष्ट्र युवा फाउंडेशनच्या माध्यमातून चिपळूण पर्यंत सामुग्री पोहोचवण्याचे काम केले.संपूर्ण महाराष्ट्रातून व सगळ्या क्षेत्रातून महाराष्ट्र युवा संघटनेच्या या कामाचे कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment