जिल्हा परिषद शाळा ताबडतोब सुरु करा ; "शाळा व्यवस्थापन समिती वढोली कडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन".
चंद्रपूर : कोविड महामारीमुळे 20 मार्च 2020 पासून म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून जि. प. शाळा बंद असून आजतगायत शाळा उघडल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येत नसून त्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे वढोलीतील पालक हे जास्तीत जास्त शेतकरी असल्यामुळे त्यांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याकरिता पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे विध्यार्थी गावात गलिबोळातून उनाडपणे फिरत आहे.
त्यातच प्रशासनाने ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरु केली असली तरी 50% पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना नेटवर्क मिळत नाही त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठविल्यापासून गोंडपिपरी तालुक्यातील दारू दुकानें सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असून तिथे तळीरामांची मोठया प्रमाणात गर्दी बघायला मिळते तरीसुद्धा शासनाने त्यांना कुठल्याही प्रकारचे कोविड नियम पाळण्याकरिता प्रतिबंध केले नाही मग वढोली गावात गेल्या एक वर्षापासून एकही कोरोन्याचा रुग्ण मिळाला नाही तरी शाळेलाचं का बंदी केली असा संतप्त सवाल गावातील पालक करीत आहे त्याकरिता आज दि. 20-09-2021 रोजी शाळा चालू करण्यासंदर्भात सर्व पालकांच्या साहिणीशी शाळा व्यवस्थापन समिती मार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले आहे निवेदन प्राप्तीनंतर ताबडतोब शाळा सुरु करा अन्यथा विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानाला आपण स्वतः जवाबदार असणार असं संतप्त इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप लाटकर यांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी संदीप पौरकर ग्रामपंचायत सदस्य, संदीप लाटकर शाळा व्य. स. अध्यक्ष, वासुदेव लाटकर, मारोती भोयर, राहुल आभारे, रुपेश नामेवार, दयाराम मेश्राम, सचिन कोहपरे, विकास भोयर, व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते


No comments:
Post a Comment