आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त समता सामाजिक फांऊंडेशनने केला गुणवंतांचा सन्मान !!
मुरबाड -(मंगल डोंगरे) : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस काल 19 सप्टेंबर रोजी मुरबाड तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याचेच औचित्य साधुन, समता सामाजिक फांऊडेशन या सेवाभावी संस्थेने तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या हि-यांचा शोध घेऊन त्यांना स्मृती चिन्ह, शाल,व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुवर्णाताई ठाकरे, माजी जि.प.सदस्या जयश्री ताई इनामदार, शिल्पा देहेरकर, सौ. कल्पना पवार व अंगणवाडी शिक्षिका सौ. रुपाली रोडगे मँडम यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तर दै.पुण्यनगरी व दै.सकाळचे प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार श्री. नंदकिशोर मलबारी, दै.ठाणे वैभवचे पत्रकार श्री. मंगलजी डोंगरे, दै.नवाकाळचे पत्रकार श्री. जयदीप अढाईगे, दै.लोकमतचे पत्रकार श्री. प्रकाश जाधव, मुरबाड लाईव्हचे संपादक श्री. संजय बोरगे, दै.जिवनदिप वार्ताचे दिलीप पवार, अंबरनाथ टाईम्सचे लक्ष्मण पवार, यांना कर्तव्य दक्ष पत्रकार पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले.
त्यासोबतच मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, यांच्या वतीने सहाय्यक पो.नि.सोनोने, व गुप्तचर विभागाचे विनायक खेडकर यांना कर्तव्य दक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
य प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंतराव सुर्यराव सर, उपाध्यक्ष भास्कर शेठ वडवले, सरचिटणीस जयवंत कराळे सर, दिलीप देशमुख, माजी जि.प.सदस्या जयश्री ताई इनामदार, शिल्पा देहरकर, सुवर्णा ताई ठाकरे, काँंग्रेसचे युवानेते नरेश मोरे, काँंग्रेसचे मुरबाड तालुका उपाध्यक्ष सुधाकर शेळके, सहाय्यक पो.नि.सोनोने, पो.ह.विनायक खेडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
समता सामाजिक फांऊडेशन हि संस्था गेल्या काही वर्षापासून मुरबाड तालुक्यात कार्यरत असुन, शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात गोरगरिबांना मदत करणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे, मोफत आरोग्य शिबिर राबवुन गरजुना आरोग्य सेवा पुरविणे असे उपक्रम सतत राबवताना दिसून येते. मात्र आज या संस्थेचे ,संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरजी करडे हे स्वतः दै.गावकरीचे पत्रकार असल्याने त्यांनी यावेळी चक्क पत्रकार बांधवांना सन्मानित करून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्याना प्रसिद्धी देणा-या पत्रकार बांधवांचा विसर पडणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घालुन आमदार किसन कथोरे साहेब यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा. अर्पण केल्या असुन सदरचा कार्यक्रम मुरबाड तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. तर उपस्थितीतानी मुरबाडच्या सर्वांगिण विकासासाठी आ.कथोरे यांना सुयश, निरोगी आयुष्य लाभो अशा भावना व्यक्त केल्या आहेत.





No comments:
Post a Comment