अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी भू माफियांचा नवा फंडा ; "आमदार-खासदार मंत्री महोदय यांच्या हस्ते अनधिकृत गाळ्यातील दुकानाचे उद्घाटन"
संदीप शेंडगे / महाराष्ट्र
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी भूमाफियांनी नवीन फंडा / शक्कल लढविली आहे.
पालिका हद्दीत मुख्य रस्त्याच्या बाजूला अनधिकृत व्यवसायिक गाळे बांधायचे आणि या अनधिकृत गाळ्यावर पालिकेच्या अधिकार्यांनी कारवाई करू नये म्हणून आमदार खासदार मंत्री महोदय यांना उद्घाटनाचे निमंत्रण द्यायचे असा नवीन फंडा भूमाफियांनी अवलंबिला आहे.
अनधिकृत गाळ्यांचे शनिवार-रविवार सुटीच्या दिवशी तातडीने कामे उरकून घ्यायची आणि आमदार खासदार मंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे असे मोठ मोठे बॅनर लावून जोरदार जाहिरात करायची
आमदार खासदार मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने पालिका अधिकारी अशा अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करतात या अनधिकृत बांधकामाला मोठ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे आपण कारवाई केली तर आपली बदली होऊ शकते या भीतीने पालिका अधिकारी या ठिकाणी फिरकतच नाहीत याचाच फायदा अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
अनधिकृत गाळे कार्यालये बांधायचे आणि आमदार खासदार मंत्री महोदय ज्यांना उद्घाटनाचे निमंत्रण द्यायचे तसेच उद्घाटनाचे मोठ मोठे बॅनर लावून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा आणि आपल्या अनधिकृत बांधकाम वाचवायचे.
खासदार आमदार माजी मंत्री महोदय यांनी उद्घाटन करण्याअगोदर सदरील बांधकाम हे अनधिकृत आहे की अधिकृत आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे. आमदार खासदार मंत्री महोदय उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारून अनधिकृत गाळ्याचे उद्घाटन करून अशा बेकायदेशीर व अवैध अनधिकृत गाळ्याना पाठीशी घालत तर नाहीत ना अशी शंका नागरिकांना पडली आहे.
असे असेल तर आमदार खासदार मंत्री महोदयांनी गोरगरिबांनी चाळींमध्ये घेतलेल्या खोल्यांची उद्घाटन करावे जेणेकरून गोरगरिबांच्या मेहनतीने बांधलेल्या घरावर पालिकेचे अधिकारी कारवाई करणार नाही.
आमदार खासदार मंत्री महोदयांनी उद्घाटनाला वेळ देण्याअगोदर उद्घाटन करीत असलेले बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत आहे हे तपासून घ्यावे यानंतरच उद्घाटन करावे असे सर्वसामान्य नागरिकांना वाटते.
यापुढे अनधिकृत बांधकाम केलेल्या गाळ्याचे उद्घाटन करण्याकरिता निमंत्रण आल्यास आमदार खासदार मंत्री महोदय हे आपल्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी अनधिकृत बांधकामाचे निमंत्रण स्वीकारतात की नकार देतात याकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment