Monday 27 September 2021

मुरबाड मध्ये भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद !! मात्र ** शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती संघटना, प्रहार संघटना सह सर्व सहभागी पक्षानी केला भांडवल वादी सरकारचा निषेध ***

मुरबाड मध्ये भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद !!

मात्र **
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती संघटना, प्रहार संघटना सह सर्व सहभागी पक्षानी केला भांडवल वादी सरकारचा निषेध ***


मुरबाड, { मंगल डोंगरे } : आज भारतभर शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला मुरबाड तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला असुन, या बंद मध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती संघटना, प्रहार संघटनासह सहकारी पक्ष सहभागी झाले होते.


           केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत. या मागणीसाठी गेले आठ महिन्यापासून दिल्लीत अंदोलन सुरू असून, या आंदोलनाला आज दिनांक 27 रोजी देशभरातील भाजपा  विरोधातील  सर्व पक्षा सोबतच      
शेतकरी, कामगार, श्रमिक, दुकानदार यांनी पाठींबा. दिला असून, मुरबाड मध्ये सर्व कामधंदे ,दुकाने, औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरु ठेवून मुरबाड कर बंदमध्ये सहभागी झाले असुन, येथे अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात येऊन केंद्रातील भाजपा सरकारने केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी केली. याप्रसंगी केंद्र शासनाचा समाचार घेताना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी मोदी सरकारने सत्तेवर येण्यासाठी तरुणांना कबूल केलेल्या वर्षाला दोन कोटी नोक-या, प्रत्येकाच्या खात्यात पडणारे 15 लाख रुपये गेले कुठे, मोदींनी दिलेली आश्वासने आणि घोषणा ह्या पोकळ वादे ठरले असून, त्यात 14 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली असून याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे.हे सरकार भांडवल दारांच्या दावणीला बांधण्याचा आरोप श्रमिक मुक्तीच्या इंदूमती तुळपुळे यांनी केला. लोकांना गरीबीचे चटके बसु लागले आहेत. मात्र बहुमतातील सरकारच्या पुढे सर्वच पक्ष हतबल झाले आहेत. त्यांच्या पुढे मोर्चे, आंदोलने आणि निषेध याशिवाय दुसरे हत्यार आता बोथट ठरत असुन, गोरगरिबांसाठी हे सर्व पक्ष ,संघटना आजही तितक्याच ताकदीने रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवून निषेध व्यक्त करताना दिसतात. हाच विरोध आणि मागण्या. लावून धरण्यासाठी आज मुरबाड तहसिलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.. यावेळी काँग्रेसचे मुरबाड तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, शिवसेना मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ  दुधाळे, काॅम्रेड विलास शेलार , दिलीप धनगर, संध्या कदम, दिपक वाकचौडे, अविनाश भोईर ,काँ.नारायण दादा पाटोळे, काँ. शारदा शेलार, काँ. अंजली जामघरे, यांचेसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...