Wednesday 29 September 2021

डोंबिवलीतील अत्याचार पिडीतेच्या न्याय हक्कासाठी समविचारी संस्था, पक्ष, संघटना एकवटल्या....!

डोंबिवलीतील अत्याचार पिडीतेच्या न्याय हक्कासाठी समविचारी संस्था, पक्ष, संघटना एकवटल्या....! 


डोंबिवली, (प्रतिनिधी) : कल्याण - डोंबिवली मधिल विविध पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी डोंबिवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून १४ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. 


या निवेदनात १) सदर पीडित बालिकेच्या परिवारास पन्नास लाखाची मदत सरकारने तत्काळ जाहीर करावी, अन्यथा घरातील एका व्यक्तीस शासन दरबारी नोकरी द्यावी या मागणीसह  पिडीताच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मोफत पोलीस संरक्षण देण्यात यावे, सदर गुन्ह्याचा तपास एस.आय.टी. करीत असल्याने तज्ञ व अनुभवी अधिका-यांमार्फत तपास करण्यात येवुन सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. 


या खटल्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करून दोषींना फाशीची शिक्षा करण्यात यावी. या मागण्यांसह कल्याण-डोंबिवली परीसरात चालू असलेले अनधिकृत हुक्का पार्लर, दारूचे अड्डे, उध्वस्त करून चरस-गांजा व इतर अमली पदार्थांची तस्करी व अवैध विक्री करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून असे धंदे त्वरित बंद करण्यात यावेत. यांसारख्या विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सदर निवेदनावर आण्णासाहेब पंडित (प्रदेश-सरचिटणीस, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती), काळू कोमास्कर (अध्यक्ष, लाल बावटा युनियन), अमित दुखंडे (संघटक, आझाद हिंद कामगार सेना महाराष्ट्र), पँथर आनंद नवसागरे (कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना), संजय गायकवाड (अध्यक्ष, शिक्षण स्वाभिमानी संघटना), अनामिकाताई महाले (ठाणे जिल्हाध्यक्षा, आरपीआय आंबेडकर गट), योगिनी पगारे (अध्यक्षा, भीम आर्मी) अलकाताई जगताप (महिला आघाडी ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेना), गायित्री चव्हाण (महिला अध्यक्षा अंबरनाथ तालुका, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती), नितीन दोंदे (भारतीय विद्यार्थी संघटना), राजेंद्र परांजपे (R.M.P.I.) तसेच राजु दोंदे, भुजंग साळवे, राजेंद्र पराड, गणेश हरीनामे, (सर्व अन्याय अत्याचार निर्मुलन समिती) यांचे सह विविध पक्ष संघटनांचे रमेश ढगे, हर्षल कुशालकर, दिनेश पुजारी, ज्योती कुरेल, राजेंद्र शिंदे, महेंद्र आवारे, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. वरील सर्व मागण्यांची पुर्तता करणे कामी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केला जाईल तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे यांनी उपस्थितांना दिले.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...