Thursday 30 September 2021

शेई गावचे' तारमळेमामा' कल्याण पंचायत समितीच्या सेवेतून निवृत्त, सोहळा संपन्न !!

शेई गावचे' तारमळेमामा' कल्याण पंचायत समितीच्या सेवेतून निवृत्त, सोहळा संपन्न !!


कल्याण, (संजय कांबळे) : आपल्या मनमिळाऊ आणि शांत स्वभावाने प्रशासनातील तसेच इतरांना ही 'जयहरी' करायला लावणारे शहापूर तालुक्यातील शेई गावचे नारायण दतू तारमळे अर्थात सर्वांचे तारमळे मामा हे आज जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवा निवृत झाले, त्यांचा निवृती सोहळा नुकताच कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.


कल्याण पंचायत समितीचे कुंटूब प्रमुख तथा गटविकास अधिकारी अशोक भवारी हे या सोहळ्यात बोलताना म्हणाले, प्रशासनात काम करताना आपल्या अनेक गोष्टी करायच्या राहून जातात, आपली स्वप्ने, इच्छा, आकांशा ह्या दाबून ठेवाव्या लागतात. त्याप्रमाणे सेवेत पद महत्त्वाचे नसून आपण त्या पदाची सेवा कशी करतो याला महत्त्व असते. त्यामुळे आज निवृत होणारे तारमळे यांनी चांगली सेवा केली, आणि म्हणूनच प्रशासनात चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा महत्त्वाचा घटक आहे असे त्यांनी सांगितले. तर पत्रकार संजय कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्याला अनेक कर्मचाऱ्यांची नावे माहिती नसतात. पण ते स्वतः ची वेगळी अशी ओळख निर्माण करतात. तशी ओळख तारमळे मामा यांनी केली आहे. ते एकमेव असे शिपाई आहेत की ज्यांनी प्रशासनासह कल्याण पंचायत समिती परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला 'जयहरी, म्हणायला लावले.


तसे पाहिले तर नारायण तारमळे हे १९८६ मध्ये जिल्हा परिषदेच्या सेवत रुजू झाले होते. पहिल्यांदा शहापूर पंचायत समितीला शिपाई म्हणून सेवा केली त्यावेळी शहापूर येथे एस डी पवार हे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. यानंतर त्यांची बदली १९९१ मध्ये कल्याण येथे झाली. एकत्र कुंटूबपध्दतीमध्ये वाढलेले तारमळे मामा हे माळकरी असल्याने कल्याणला ते सर्वांना जयहरी, किंवा रामकृष्ण हरी म्हणून हात जोडायचे, त्यामुळे आपसूकच समोरचा जयहरी करायचा, सेवेत असताना त्यांनी वाशिंद परिसरातील वारकरी संप्रदायाचे दिंंड्या मध्ये भालदार व चोपदार म्हणून सहभागी झाले होते. १९८५ मध्ये सुनीता यांच्याशी विवाह झाल्यानंतर आजही हे तितकेच उत्साही व तरुण दिसतात, मनमिळाऊ, शांत, संयमी असे तारमळे मामा कल्याण पंचायत समितीच्या प्रशासनात ३०/३२ वर्षे सेवा केल्यानंतर आज सेवानिवृत्त झाले आहेत. कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाकचोरे, गटविकास अधिकारी अशोक भवारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...