भिवंडीतील ग्रामीणमध्ये फार्महाऊसवर वनविभागाची धाड !! "अवैधरीत्या दडवुन ठेवलेला 2 लाखाचा खैरसाठा जप्त"
भिवंडी, दिं,13, अरुण पाटील (कोपर) :
तालुक्यातील पडघा वन परिक्षेत्राच्या कार्य क्षेत्रातील पहारे गावातील एका फार्म हाऊसवर वन विभागाने घातलेल्या धाडीत अवैधरीत्या दडवुन ठेवलेला सुमारे दोन लाख रूपयांचा खैरसाठा जप्त करण्यात करण्यात आला आहे.
किरवली परिमंडळ अंतर्गत पहारे गावाच्या हद्दीतील एका फार्म हाऊस मधील घरात व आजुबाजूच्या झुडपात सोलीव खैराचे तुकडे दडवुन ठेवल्याची खबर गुप्त खबऱ्या मार्फत वनअधीकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार योग्य नियोजन करून शनिवार त्या ठिकाणी धाड टाकून स्थानिक पोलीस पाटील भरत भोईर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सहाय्यक वनरक्षक मांडवी सुनील नाईक यांच्या आदेशाने सदर घराचे कुलूप तोडून दडवुन ठेवलेला व बाजूलाच झुडपात लपवून ठेवलेला खैर सोलीव किटा असे एकूण ११० तुकडे जप्त केले त्यांची बाजारपेठेत सुमारे २ लाख किंमत आहे जप्त केलेला खैरसाठा पडघा वनविभागाच्या विक्री डेपोवर जमा करण्यांत आला असुन सदर धडक कारवाई वनक्षेत्रपाल पडघा एस.बी. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व वनपाल किरवली साहेबराव खरे, यांचे नेतृत्वाखाली वनपाल दिनेश माळी (पडघा), श्याम चतुरे (दिघाशी), (सेवानिवृत्त वनपाल) जे. जी. भोईर, वनरक्षक प्रमोद सुतार (किरवली), शरद माढा (कांदळी), अजय राठोड (सांगाव), भाऊसाहेब अंबुरलेकर (कासणे), वनरक्षक शेलार (मैंदा), वाहन चालक विकास उमतोल, वनमजुर शांताराम भोईर या पथकाने केली.

No comments:
Post a Comment