बहादूर विद्युत कर्मचारी आणि स्थानिकांच्या अथक परिश्रमाने परतीच्या पावसाने जमिनदोस्त झालेला विद्युत पुरवठा एका दिवसात पुर्ववत त्यामुळे सर्व टीमचे सर्वत्र कौतुक !!
बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : प्रचंड मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि तुफान वादळी वाऱ्यासह पडलेल्या परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील खरवली, पेण, आमडोशी आणि बोरघर विभागातील विद्युत खांब जमीनदोस्त झाले होते, त्यामुळे या पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा पुर्णपणे खंडीत झाला होता.
विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे या पंचक्रोशीतील सर्व सामान्य जनतेचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले होते. परिणामी या पंचक्रोशीतील सर्व लहान थोर महिलांना दूर दूर वरुन डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन दिवस दिवसभर पाणी भरावे लागत होते, तर शेतावर दिवसभर राब राब राबून थकून भागून शेतकरी कष्टकरी वर्ग घरी आल्यावर घरी लाईट नसल्याने त्याची प्रचंड गैरसोय झाली.
वातावरणातील प्रचंड उष्णता आणि उकाड्यामुळे शेतकरी, कष्टकरी बळीराजाच्या अंगातून मोठ्या प्रमाणात घामाच्या धारा वाहत होत्या. दिवसभर शेतात कष्ट उपसून रात्री जमीनीवर डोकं टाकायचे म्हटलं तर शरीराचे यथेच्छ लचके तोडणाऱ्या डासांचा त्रास अशा गंभीर परिस्थितीचा सामना तब्बल एक दिवस आणि रात्र या पंचक्रोशीतील सर्व सामान्य जनतेला करावा लागला.
परतीच्या पावसामुळे खंडीत झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे झालेल्या गैरसोयी बद्दल पंचक्रोशीतील जनतेचे फोन माणगांव विद्युत वितरण कार्यालयात घणाणू लागले या कार्यालयाचे कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य तत्पर उपमुख्य कार्यकारी अभियंता श्री विजय मोरे आणि उदुगडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या विभागात कार्यरत असलेले कार्यक्षम लाईनमन, वायरमन सोलंकी यांच्या टीमने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या विभागात मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे जमीनदोस्त झालेले विद्युत खांब मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने आणि अथक परिश्रम घेऊन सर्व जमीनदोस्त झालेले खांब उभे करून त्यावर लाईन ओढून एका दिवसात विद्युत पुरवठा पुर्ववत करून या पंचक्रोशीतील सर्व सामान्य जनतेची तथा विद्युत वितरण कंपनी च्या ग्राहकांची झालेली गैरसोय दूर केली. त्या बद्दल या सर्व बहादूर टीमचे सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment