विजयी दशमी दसऱ्याच्या निमित्ताने कांबा येथे विधीवत उत्साहात पूजा !!
कल्याण, (संजय कांबळे) : हिंदू धर्म संस्कृती मध्ये अंत्यत पवित्र व महत्त्वाचा मानला जाणाऱ्या विजयी दशमी दसऱ्याच्या निमित्ताने कांबा येथे विधीवत पूजाअर्चा मोठ्या उत्साहात पार पडली.
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा, तोरण बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करु उधळण सोन्याची,जपू नाती मना मनाची, असे म्हणत, हा उत्सव साजरा करण्यात आला.यामुळे परिसरात भक्तीमय मंगल वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत ही औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या परिसरात उद्योग धंद्यात मोहन शेठ मे एक मोठे व आदरणीय असे नाव आहे. गेल्या दिड दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे या परिसरातील छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले होते. अनेक गोरगरीब लोकांचे पोट या उद्योगावर अवलंबून आहे. आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने थोडेफार उद्योग या परिसरात सुरू झाले आहेत.
त्याचीच विधीवत पूजा आज मोहनशेठ यांच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी नवीन गाडीच्या भटजींच्या हस्ते कुंकमतिलक, शेंडूच्या फुलांच्या माळा अर्पण करून मोहनशेठ यांनी श्रीफळ फोडून पूजा केली. मिठाई वाटून विजयी दशमी दस-याच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मोहनशेठ, अनिलशेठ शेलार, प्रसार शेठ मोरे, राकेश शेठ मोरे, कांबा गावचे छगन शेठ बनकरी, योगेश शेठ बनकरी, वरप गावचे बाका शेठ पावशे,पत्रकार संजय कांबळे, कर्मचारी मुरलीधर सोनावणे, देविदास पाटोळे, मोतिराम बनकरी, संदेश बनकरी, आदी ड्रायव्हर व मजूर उपस्थित होते.



No comments:
Post a Comment