निर्धार पुनर्वसनाचा....!
सन २०२२ मध्ये एक हजार सफाई कामगारांच्या पुनर्वसनाचा अन्याय अत्याचार निर्मुलन समिती (महाराष्ट्र राज्य) मार्फत निर्धार....!
मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता
"राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ," या महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या योजनेत रू. ५ लाखापासून तर २५ लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाते.
हे अर्थसहाय्य सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाकडून केले जात असून जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे राबविली जाते. अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सफाई कामगार व सेवानिवृत्त सफाई कामगार यांचा सर्वे करुन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची शिक्षण, आरोग्य, निवास या संदर्भात सविस्तर माहीती घेवुन त्यांचा आर्थिक व सामाजिक दर्जा सुधारावा यासाठी व त्याचे पुनर्वसन करण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य. या सामाजिक संघटनेमार्फत समुपदेशन करुन शासकीय स्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याची माहीती समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांनी दिली.
ग्रामपंचायत, ग्रामपालिका, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, तसेच माॅल व खाजगी इमारती, खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या सफाई कामगारांनी समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे 📞९४२३१२१४११ या व्हाट्सअप नंबरवर आपली माहिती थोडक्यात सादर करावी आणि ओझर ता.निफाड जि.नाशिक येथील संपर्क कार्यालयात रितसर फार्म भरुन द्यावा. या फाॅर्मची कुठल्याही प्रकारची फी अथवा देणगी घेतली जात नाही.
तरी गरजु व गरज असलेल्या सर्व सन्मानिय सफाई व अस्वच्छ कामगारांनी संपर्क साधावा असे आवाहन प्रदेश निमंत्रक प्रशांत ढेंगळे, प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब पंडीत, प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ.रमेश सावंत, प्रदेश उपाध्यक्षा प्रो.प्रेमलताताई जाधव, वसंतराव वाघ, प्रदेश संपर्क प्रमुख भावनाताई थोरात, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस रफीक सैयद, उ.महा. कार्याध्यक्ष प्रदीपनाना गांगुर्डे, उत्तर.मला.कोषाध्यक्ष जसपालसिंग कोहली, उ.महाराष्ट्र. सचिव जोशिलाताई पगारीया, धुळे जिल्हाध्यक्षा शोभाताई नगराळे, जळगांव जिल्हाध्यक्षा एँड.सिमाताई जाधव, पुणे जिल्हाध्यक्षा स्मिताताई दातीर, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष चाळके, अहमदनगर जिल्ह्याध्यक्षा रमादेवी धिवर, रायगड जिल्हाध्यक्ष दिनेश भालेराव निफाड तालुकाध्यक्ष शशीभाऊ जाधव, आदींनी केले आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आयु.संदीपभाऊ अ.साबळे*
(प्रसिध्दी प्रमुख)
*नाशिक जिल्हा.अ.आ.नि.स.*




No comments:
Post a Comment