Thursday, 7 October 2021

परतीच्या पावसाचा शेतकरी व गोरगरिबांच्या नशिबाशी तूफान 'गरबा' शेतीसह घरांचे नुकसान, शेरे गावास तडाखा?

परतीच्या पावसाचा शेतकरी व गोरगरिबांच्या नशिबाशी तूफान 'गरबा' शेतीसह घरांचे नुकसान, शेरे गावास तडाखा?


कल्याण, (संजय कांबळे) : राजाने मारलं आणि निसर्गाने झोडलं तर न्याय कोणाकडे मागायचा? अशी स्थिती सध्या कल्याण, मुरबाड, शहापूर, तालुक्यातील शेतकरी व गोरगरिबांची झाली आहे. परतीच्या पावसाने यांच्या नशिबाशी असा काय तूफान दाडींया गरबा खेळलाय की, अशा संकटकाळात जगावं की मरावं हेच मोठे कोडं त्यांच्या समोर पडले आहे.


ठाणे जिल्ह्यातील, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी तालुक्यातील काही भाग हा शहरी असा आहे, तो सुधारला, विकसित आहे,तर दुसरीकडे या तालुक्यातील बहुतांश गावे ही आजही भयंकर मागासलेली आहेत. विकासाचा कोणी कितीही दावा केला तरी रस्ते, पाणी, आरोग्य, निवारा अश्या मुलभूत सोईसुविधा गाव वाड्या वस्त्या पर्यंत पोहोचले ल्या नाहीत. गल्ली बोळात राजकारण, व यातून पसरलेल्या कार्यकत्याचे पिक, यांनी सेस फंड, विविध वित्त आयोग, इतर बांधकाम निधीची स्वतः करीता कामे मिळवली, ती किती टिकली व भविष्यात किती टिकतील राम जाणे!


निवडणूक आली की हुजरेगिरी, उचलेगिरी, यातून चारपाच दिवस 'जिवाची मुंबई' झाली की पुन्हा पुढील निवडणुकीपर्यंत काबाडकष्ट, शेतमजूरी करायला मोकळे? ना जाब विचारु शकत ना काही बोलू शकत?यातूनही हिंम्मत केलीच तर साहेबांचे, उजवे डावे आहेतच 'मसाज, करायला. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार कोण? याचा प्रत्येकांनी विचार करायला हवा, सगळे सारखेच, हे शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांना कधी कळणार?


प्रत्येक वर्षी वरुणराजा चा तडाका आहेच, अशातच कोरोना महामारी आली, यामुळे गेली दिडदोन वर्षे जिवन थांबले, ग्रामीण भागातून मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथे कामाला येणाऱ्या तरुणांचे काम गेले, छोटे मोठे उद्योग, व्यवसाय बंद पडले. यातून ही कसेबसे सावरत असतानाच अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने कंबरडे मोडले, २००५, २००१८ व आता२०२१ अशा सततच्या पुरामुळे होते नव्हते ते पण गेले.


कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा, रायते, नडगाव परीसर, मुरबाड, शहापूर, भिवडी, नुकसान ग्रस्त झाले. या नुकसान भरपाईचा पत्ता नसताना आता पुन्हा ऐन नवरात्र उत्सवात  काल परवा झालेल्या तूफानी वादळी वा-याच्या पावसाने अनेक ठिकाणी झाडें पडली, पत्रे, घरावरील कौले, उडून गेले.


शेरे गावातील श्रीमती व्दारकाबाई मंगल पंडित या वयोवृद्ध आजीच्या घराची कोले, सिंमेट पत्रे, आंब्याचे झाड, शौचालय याचे पत्रे, दरवाजा तूफान वादळाने उडून गेले. लाईटचे पोल व तारा तुटल्यामुळे बत्ती गुल झाली आहे. आता ते दुरुस्त करायचे का जीव जगवायचा असा मोठा कठीण प्रश्न तिच्या समोर पडला आहे.

ऐवढी कठीण संकटे झेलत असतानाच मेहरबान सरकारची महागाई काही केल्या सात सोडेना झाली आहे. घरगुती गँस हजारी पार करून पुढे धावत आहे, पेट्रोल, डिझेल, आणि आता सीएनजी खाली उतरायचे नाव घेईना, तेल, डाळी काही केल्या ऐकेनाथ, नोकरी, धंदा मिळेना, यातून पुन्हा गरीबी, हे दुष्ट चक्र कधी थांबणार? असा दोष नशिबाला देत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी गोरगरीब, आदिवासी मरणाला जवळ करीत आहेत. परंतु यांचे कोणालाही काही सोयरसुतक पडलेले नाही. ज्यांची मुलं नातेवाईक थोडाफार खर्च करु शकतील ते श्रध्दांजली च्या माध्यमातून बँनर व झळकतील, बाकी इतर गपचुप वैंकूठवाशी होतील, हे कठोर आहे. परंतु सत्य आहे. त्यामुळे आताच भविष्यातील धोका ओळखा, निसर्गाला शरण जा, पर्यावरणाचा समतोल राखा, कारण ढोंगी व लबाड माणसापेक्षा तोच तुमची स्वप्ने पुर्ण करु शकतो.

प्रतिक्रिया : "माझा मुलगा मोलमजुरी करून माझे व कुंटूबियाचे पोट भरतो, त्यात आता वादळी पावसाने घराची कौले, शौचालयाचा दरवाजा, आंब्याचे झाड, भिंतीला तडे असे नुकसान झाले आहे त्यात महागाई, त्यामुळे जगायचे की मरायचे? -व्दारकाबाई मंगल पंडित,(वयोवृद्ध, आजी, शेरे,ता शहापुर)

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...