कापसाला किमान हमीभाव "८०००₹" मिळाला पाहिजे.. किसान सभा २५ सभा घेणार शेतकरी जागरण करणार !
चोपडा, प्रतिनिधि :
यावर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांनी लावलेला कापूस पीक उध्वस्त झाले असून कपाशीच्या जो लाग लागला आहे त्याच्या कैऱ्याही खराब खराब झालेल्या आहेत त्या तोडून आणून त्यातून योग्य कापूस काढून सुकवायला टाकून ती तयार कपाशी विकण्यासाठी तयार करावी लागत आहे. उत्पादनात ५० ते ७० टक्के घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्च देखील निघालेला नाही निघणार नाही. अशावेळी शेतकऱ्यांचा कापसाला सरकारने जाहीर केलेला हमी भाव ५७२६ रुपये जाहीर केलेला आहे आणि शेतकऱ्याचे घरात आलेला कापसाला हमी भाव भाव मिळतील अशी गारंती नाही.. कपाशीला खर्च नुकसान लक्षात घेता "८०००_₹" चा भाव मिळावा. नुकसान भरपाई म्हणून 'दर एकर पन्नास हजार रुपये मदत' मिळाली पाहिजे. तरच शेतकरी तग धरू शकेल तसेच शेतकऱ्यांचे 'पीक कर्ज सोसायटी माफ करावी' आणि 'नवीन कर्ज' मिळावे. रब्बीचे बियाणे मिळावे. तसेच 'पीक विम्याची रक्कम' मिळाव्यात. अशी मागणी जळगाव जिल्हा किसान सभेने केली आहे. किसान सभेच्या या मागणी पत्रावर, माजी जिल्हा परिषद सदस्य का शिवाजी नाना पाटील, अमृत महाजन, गोरख वानखेडे, चंद्रकांत माळी, धोंडू पाटील, सुनील पाटील, निंबाजी बोरसे, अनंत चौधरी, मनोहर चौधरी, निंबा पाटील, चंद्रकांत साळी, योगराज पाटील, बाळू बडगुजर, एकनाथ महाजन, रवींद्र भावसार, शिवाजी बंडू पाटील, शांताराम पाटील, विश्वास धनगर, आदींनी केली आहे.
*कपाशी भाव प्रश्नावर किसान सभा दसरा ते दिवाळी दरम्यान दहा जाहीर सभा येणार असून ग्रामपंचायतीवर निवेदन देणार आहे असेही जाहीर करण्यात आले या संदर्भात कार्यक्रम लवकरच तयार करण्यात येईल असे किसान सभेच्या जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे*

No comments:
Post a Comment