Thursday, 7 October 2021

"राखण" मराठी लघुपट होतोय लवकरच प्रदर्शित !!

"राखण" मराठी लघुपट होतोय लवकरच प्रदर्शित !!


कोकण  -  ( दिपक कारकर ) :

विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी ९ रंग कलामंच हि संस्था लघुपट वेबसिरिज नाटक, रियालिटी शो असे अनेक उपक्रम राबवत असते. त्यामधीलच एक सध्यस्थीत कलाकार जिवन शैलीवर भाष्य करणारा लघुचित्रपट राखण या चित्रपटाचा ट्रेलर ९ रंग Film Production या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती रत्नागिरी जिल्ह्यातील निर्माते 'प्रविण रामचंद्र सावंत' यांनी केली आहे. तर कथा/पटकथा/ संवाद/ दिग्दर्शन 'सागर सखाराम नांदळजकर' यांचे असुन सह दिग्दर्शन किरण देवकर यांनी केले आहे. छायाचित्रण कमलेश सनगरे, संकलन सौजन्य कदम, डबिंग मिक्सिंग संदिप पालेकर, संगीत अक्षय सुतार, तसेच सतिश हांडे, कृष्णा गोसावी, वंदना जामसांडेकर बाल कलाकार आर्या कोळेकर, प्रविण सावंत, संजय पवार यांनी अभिनय केले आहेत. रत्नागिरी जिल्यातील खेड तालुक्यातील धामणी गावामध्ये याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. लवरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा लघुपट प्रेक्षकांना एक वेगळा संदेश देऊन जाणार असून तो आवर्जून पहावा असे आवाहन सागर नांदळजकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...