जुन्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन नूतनीकरण महागणार, भरावे लागणार तब्बल 8 पट अधिक पैसे !!
भिवंडी, दिं,7, अरुण पाटील (कोपर) :
जुन्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनबाबत नवा नियम जारी करण्यात आला आहे. 15 वर्ष जुन्या कारचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील वर्षी एप्रिलमध्ये तब्बल आठपट अधिक रुपये भरावे लागतील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण (रिन्यू) करण्याची अधिसूचना जारी केली आहे. हा नवा नियम राष्ट्रीय वाहन स्क्रॅपेज पॉलिसीचा भाग आहे.
* 15 वर्ष जुन्या कारचं रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी सध्याची फी 600 रुपये आहे. ती आता 5000 रुपये होईल.
* जुन्या बाइकचं रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी सध्याची फी 300 रुपये आहे, ती वाढून 1000 रुपये होईल.
* त्याशिवाय बस किंवा ट्रकसाठी फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्याची सध्याची फी 1500 आहे, ती वाढून 12,500 रुपये करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार, या नियमांना केंद्रीय मोटर वाहन नियम 2021 म्हटलं जाऊ शकतं. हे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत. फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपल्यानंतर, त्यापुढील प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल.
दरम्यान, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातात जखमींना अर्थात अपघात झाल्यापासून एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला 5000 रुपये बक्षिस म्हणून दिले जाण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना रस्ते अपघातात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी लाँच करण्यात आली आहे.ही योजना 15 ऑक्टोबर 2021 पासून लागू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment