प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार?
कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर, नागरिक संतप्त !**
कल्याण | प्रतिनिधी
कल्याण तालुक्यातील मौजे नव गाव परिसरात वनविभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. वन व्यवस्थापन समिती व ठेकेदारांकडून शासनाचा निधी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला असून, याकडे संबंधित प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दिनांक 22/12/2026 रोजी या गैरप्रकाराबाबत “बातमीदार माझा” या चॅनलच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. मात्र इतके गंभीर प्रकरण समोर येऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कामे निकृष्ट दर्जाची असूनही ती अद्याप सुरूच आहेत. वनसंपदेचे नुकसान होत असताना आणि शासनाचा पैसा वाया जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
“महाराष्ट्रात लोकशाही आहे की हुकूमशाही?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून विचारला जात असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment