Tuesday, 3 February 2026

हेडलाईन्स - कल्याण तालुक्यात घडलेल्या वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा !!

** हेडलाईन्स....

कल्याण तालुक्यात घडलेल्या वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा !!

सविस्तर वृत्तांत ...

दिनांक 22/12/2026 रोजी कल्याण तालुक्यात मौजे नव गाव येथे वनविभागाचा भोंगळ कारभार येथील वन व्यवस्थापन समितीने चव्हाट्यावर आणून कशाप्रकारे शासनाचा निधी हडपण्याचा प्रयत्न होतो हे नागरिकांना 'बातमीदार माझा' या चॅनलच्या माध्यमातून दाखवून जनजागृती केली होती, परंतु याबाबत शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलेही ठोस पाऊल न उचलता अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व संताप व्यक्त होत आहे. 

यात अधिकारी व ठेकेदार यांच्यात काही संगनमत असल्याची नागरिकांची शंका आहे, यासाठीच संबंधित ठेकेदार तसेच अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ते निकृष्ट दर्जाचे बांधकाम अजूनही सुरू आहे. स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी खालच्या दर्जाचे काम करणारे ठेकेदार व त्यांना अभय देणारे अधिकारी यामुळे महाराष्ट्रात ठेकेदार यांची मनमानी वाढली असून त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार?कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर, नागरिक संतप्त !**

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार? कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर , नागरिक संतप्त !** ...