१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!
ठाणे, प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवडण्यात आलेल्या १३० “हिर्यांमध्ये” उल्लेखनीय कार्यामुळे मा.श्री. विजय जाधव साहेब (उपनियंञक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह – ठाणे, गृह विभाग विशेष, महाराष्ट्र शासन) यांचा कौतुक सन्मान रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे येथे संपन्न झालेल्या Asian Youth Image Conference & Award Ceremony – 2026 मध्ये करण्यात आला.
इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स (IIORC मान्यताप्राप्त) संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व लोकाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नागरी संरक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन, जनजागृती, स्वयंसेवक प्रशिक्षण, तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्पर मदत देण्यासाठी श्री.जाधव साहेब यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई समुह, ठाणे विभागात नागरी संरक्षण कार्य अधिक सक्षम झाले असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुणे, मान्यवर, पुरस्कारार्थी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. श्री. विजय जाधव साहेब यांचा झालेला हा गौरव नागरी संरक्षण विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसाठी अभिमानास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment