Tuesday, 3 February 2026

जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न !

जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न !

ठाणे (शांताराम गुडेकर) :

          ठाणे जिल्ह्यातील मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जी.के.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे सालाबादप्रमाणे या ही वर्षी  विद्यार्थांच्या अंतर्गत असणाऱ्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. सागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. प्रशांत तांदळे सर यांनी केले .या कार्यक्रमात इयत्ता बारावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ देखील करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. बी.एल. जाधव सर यांचा सत्कार करून करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. सागर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या एकूण प्रगतीचा आढावा घेतला आणि विद्यार्थींना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

               या वेळी  विविध स्तरावर खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कु. करण भोईर, वृषाली, जानवी ढमाले, कामिनी बोंबे या खेळाडूंचे तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर कोळीगीते, हिंदी आणि मराठी सिनेमातील गाण्यांवर विद्यार्थांनी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश घरत सर यांनी केले. यावेळी प्रा. शेख शफीक सर, प्रा. रसिका लोकरे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कु.भार्गवी पितांबरे, कु.रुचिका झंझड, कु.जिन्यासा पाटील, कु सुप्रिया जाधव, कु.आरती पवार, कु.ऋतुजा सोनवणे, कु.साक्षी जाधव, कु.मनीष पवार यांनी उत्तम सादरीकरण केले. आणि शेवटी प्रा.तांदळे सर यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ;  उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!! ठाणे...