Tuesday, 12 October 2021

आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनच्या माध्यमातून श्री. राहुल पांडे यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली !!

आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनच्या माध्यमातून श्री. राहुल पांडे यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली !!
 

कल्याण, प्रतिनिधि :

श्री राहुल पांडे यांना अंब्लिकर हर्निया  चा त्रास होता. तीन-चार वर्षापासून त्यांनी त्रास सहन करत राहिले. कारण त्यांना कुठे प्रकारची अवक नसतांना. प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च त्यांना पुरवडत नव्हता आणि सरकारी हॉस्पिटल मध्ये फिरफिर जास्त करावे लागत होते. राहुल पांडे हे रिक्षाचालक आहे आणि रिक्षाच्या धंद्यांमध्ये खूप मंदी असल्याने त्यांच्याकडे पुरेसा पैसा ऑपरेशनसाठी जमत नाही होते. आणि ऑपरेशन साठी कोणाकडून मदत मागितली तरी त्यांना मिळत नव्हती. एक दिवशी आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन श्री. जितेंद्र पाटील यांनी आरोग्य शस्त्रक्रिया शिबिर त्यांच्या ऑफिसला भरवले. श्री राहुल पांडे यांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन शस्त्रक्रिया शिबिराच्या मेसेज वाचून त्यांनी श्री जितेंद्र पाटील यांना संपर्क केला. श्री जितेंद्र पाटील यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी तेरणा हॉस्पिटल नेरुळ.नवीमुंबई याठिकाणी रवाना करण्यात आले. श्री राहुल पांडे यांना त्यादिवशी ॲडमिट करण्यात आले. आणि त्यांच्याकडे कुठलाही खर्च न घेता सर्वे रिपोर्ट. औषधी. जेवण.आणि ऑपरेशन सर्वे मोफत करण्यात आले. श्री राहुल पांडे यांना आठ ते दहा दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याची सुट्टी करण्यात आली. आता श्री राहुल पांडे आपल्या परिवारासोबत एकदम ठणठणीत आहेत त्यांनी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले.


No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...