एन आर सी कॉलनी परिसरातील रस्त्याची दुरुस्ती दोन दिवसात !!
"माजी सभापती दया शेट्टी यांनी घेतली कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांची भेट"
कल्याण, संदीप शेंडगे : एन आर सी कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याची बातमी प्रकाशित झाली होती.
या बातमीची 'माजी सभापती दया शेट्टी' यांनी दखल घेतली असून लागलीच त्यांनी बांधकाम विभागाचे 'कार्यकारी अभियंता सुभाष पाटील' यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
एन आर सी कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली होती येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. खड्ड्यांमधून वाहन चालकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले होते तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत होती या धुळीमुळे नागरिकांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. अशी बातमी प्रकाशित होताच 'दया शेट्टी' यांनी 'कार्यकारी अभियंता सुभाष पाटील' यांची भेट घेऊन तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. 'कार्यकारी अभियंता सुभाष पाटील' यांनी तातडीने आदेश काढून दोन दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे 'माजी सभापती दया शेट्टी' यांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे एन आर सी कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्याची दुरुस्ती दोन दिवसात होणार असल्याने नागरिकांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांनी 'माजी सभापती दया शेट्टी' यांच्या कार्याचे कौतुक केले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.


No comments:
Post a Comment