Wednesday, 13 October 2021

ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस (आय) कमिटीच्या प्रयत्नाने बंद असलेली 'अमृत नगर- घाटकोपर स्टेशन (प.)' बससेवा पुन्हा सुरु !!

ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस (आय) कमिटीच्या प्रयत्नाने बंद असलेली 'अमृत नगर- घाटकोपर स्टेशन (प.)' बससेवा पुन्हा सुरु !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
      बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या एन वार्डच्या अधिपत्यात येणाऱ्या घाटकोपर पश्चिम/विक्रोळी पार्क साईट विभागातील 'अमृत नगर ते घाटकोपर स्टेशन पश्चिम' अशी ४१६ बस ही अनेक महिण्यांपासून बंद होती. त्यामुळे विक्रोळी पार्क साईट, अमृत नगर, जगडुशा नगर येथील रहिवासी वर्गाची मोठी गैरसोय होत होती. शेअर्स रिक्षावाल्यांडून तर बस बंद झाल्यानंतर प्रवाशांकडून लुट सुरु होती. मनाला येईल ते भाडे हे शेअर्स रिक्षावाले घेत होते. याबाबत सतत प्रवाशी व शेअर्स रिक्षावाले यांच्यात वाद होत होते. याची दखल ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस (आय) कमिटिने घेतली व अब्राहम राँय मणी (अध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शनाखाली १२४ चे ब्लाँक अध्यक्ष माजी दूरसंचार सल्लागार समिती भारत सरकारचे सदस्य आणि रेशनिंग दक्षता समिती महाराष्ट्र शासन सदस्य खलील खोत (विशेष कार्यकारी अधिकारी- महाराष्ट्र शासन) यांनी बेस्ट प्रशासनाच्य संबंधित विभागाशी (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम) पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले व बेस्ट प्रशासनाने 'बस क्र.A-416' ही वातानुकूलीत बस 'अमृत नगर ते घाटकोपर स्टेशन पश्चिम' अशी सुरु केली. हा बसमार्ग सुरु करतेवेळी ई.मुं.जि.काँ.कमिटी सचिव राम गोविंद यादव, शांता म्हसदे, मनोज राजभर, अल्तापभाई मुन्शी, नाशीर घौर खान यांच्यासह अल्ली हसन, आयुबभाई, हरिषभाई धात्रुट, पाड्येजी, अँड.उस्मानजी, अक्तर शेख, लालचंद्र गुप्ता, समिर अक्तर आदी मान्यवर उपस्थित होते. हा बसमार्ग सुरु झाल्यामुळे पार्क साईट विक्रोळी, अमृत नगर, जगडूशा नगर येथील प्रवाशीवर्गाला दिलासा मिळाला आहे. बस मार्ग सुरु झाल्याबद्दल अब्राहम राँय मणी, खलील खोत यांच्यासह ईशान्य मुंबई जिल्हा  काँग्रेस (आय) कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य  व सभासद यांचे रहिवासीवर्ग व प्रवाशीवर्ग यांच्यातर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...