Saturday 30 October 2021

शिवसेना शाखा क्र. १७ शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यातर्फे नवीन मतदार नोंदणी जनजागृती आणि शासकीय योजना विषयक मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन !!

शिवसेना शाखा क्र. १७ शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यातर्फे नवीन मतदार नोंदणी जनजागृती आणि शासकीय योजना विषयक मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन !!


मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
          निवडणुकीच्या काळात सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक असतो तो म्हणजे मतदार. पण मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहाता येईल किंवा नसेल तर मतदार यादीत नाव नोंदणी कशी कराल? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादीच्या नूतनीकरणाबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असा आदेश राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिला आहे.सर्वसामान्य लोकांना याबाबतची योग्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी बोरिवली  शिवसेना शाखा क्र. १७ चे शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यातर्फे नवीन  मतदार नोंदणी जनजागृती आणि शासकीय योजना विषयक मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जर तुमचं नाव यादीमध्ये आहे पण ते चुकले असेल तर फॉर्म -८ भरवा.जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलात आणि तुम्हाला तुमचे नाव तेथे नोंदवायचं असेल तर फॉर्म ६ भरावा लागणार आहे.जर कुणाच्या नावावर तुमची हरकत असेल तर फॉर्म- ७ भरावा लागतो.विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत पत्ता बदलण्यासाठी - नमुना ८ अ भरावा लागेल.यासाठी आवश्यक २ रंगीत फोटो, वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, तुमचा पत्ता असलेला पुरावा जशे  की रेशन कार्ड, टेलिफोन-इलेक्ट्रिसिटी बिल, पासपोर्ट, लायसन्स किंवा आधारकार्ड, घरातील एका सदस्यची मतदार कार्डची छायाप्रत आवश्यक आहे.याशिवाय विभागातील नागरिकांना "सुगंधी उटणं "चे वाटप होणार आहे. शिवाय सरकारी योजना विषयक मार्गदर्शन व  निशुल्क नोंदणी करण्यात येणार आहे. या योजना मध्ये इमारत आणि इतर बांधकाम कामगार ओळखपत्र,आयुष्मान भारत-आरोग्य योजना, सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, अटल पेन्शन योजना, इ -श्रम कार्ड, घरघुती कामगार ओळखपत्र आदींचा समावेश आहे. तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी शिवसेना शाखा क्र.१७ चे शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्याशी शाखेत संपर्क करावा असे आवाहन शिवसेना शाखा १७ च्या पदाधिकारी, सदस्य आणि तमाम शिवसैनिक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...