Wednesday 27 October 2021

मंडणगड आगारातील बसेस आरटीओ पासींगसाठी रत्नागिरीत !! "ग्रामीण भागातील एसटी फेऱ्यांना होतोय विलंब विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक नागरिकांचे हाल".

मंडणगड आगारातील बसेस आरटीओ पासींगसाठी रत्नागिरीत !!

"ग्रामीण भागातील एसटी फेऱ्यांना होतोय विलंब विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक नागरिकांचे हाल".


मंडणगड, बातमीदार : मंडणगड आगारातील गाड्या आरटीओ पासींगसाठी रत्नागिरीत गेलेल्या असल्याने ग्रामीण भागातील प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. त्यामुळे आंबडवे विद्यानगरी येथे उच्च महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक व नागरिकांची गैरसोय झाली.

या संदर्भात आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता काही गाड्या आरटीओ पासींग रत्नागिरीत येथे गेलेल्या असल्याने तीन गावातील प्रवासी फेऱ्या विलंबाने सोडण्यात आल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे यासंदर्भात प्रवासी व आगार व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीत तफावत असुन सुमारे नऊ गाड्या मंडणगड आगारातून विलंबाने सुटल्याची माहिती पुढे येत आहे मात्र आगार व्यवस्थापन केवळ दोन व तीन गाड्या गाड्यांनाच विलंब झालेला असल्याचे सांगत आहे.

आरटीओ पासींगसाठी आगारातील गाड्या वेळोवेळी रत्नागिरीत जात असतात त्याचे आगाऊ नियोजन होणे आवश्यक आहे एकाही गाडीला विलंब करणे हे समस्येचे घातक ठरणारे आहे कोरोना नियमांमध्ये शिथिलता असल्याने ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालय नुकतीच सुरू झाली आहेत व शैक्षणिक कारणासाठीचा प्रवास हा एसटीवर अवलंबून असल्याने आगावू सुचना न देता गाडीच्या वेळापत्रकात झालेला बदल अडचणीचा ठरू शकतो गाड्यांना विलंब झाल्याने मंडणगड वरून आंबडवे येथे प्रवास करून जाणारे विद्यार्थी महाविद्यालयात पोहचु शकत नाहीत. 

याशिवाय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गाड्या वेळेवर न गेल्याने कामकाजाच्या वेळेत महाविद्यालयामध्ये आपली उपस्थिती नोंदवणे शक्य झाले नाही त्याच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची अवहेलना !! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घडामोडींचे...