Monday, 18 October 2021

माणगांव शहराच्या निजामपूर रोडवरील रेल्वे ब्रीज खाली असलेल्या कचरा कुंडीच्या घाणी समोर व प्रचंड दुर्गंधी समोर नगरपंचायत हतबल ? की कानाडोळा...

माणगांव शहराच्या निजामपूर रोडवरील रेल्वे ब्रीज खाली असलेल्या कचरा कुंडीच्या घाणी समोर व प्रचंड दुर्गंधी समोर नगरपंचायत हतबल ? की कानाडोळा... 
     
 
          बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : माणगांव शहरातील निजामपूर रोडवरील रेल्वे ब्रीज खाली असलेल्या कचरा कुंडीत आणि कुंडाच्या आसपास पुणे माणगांव मार्गालगत स्थानिक नागरिकांनी आपापल्या घरातील टाकलेल्या सुक्या आणि ओल्या कचऱ्यामुळे या परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी मुळे या ठिकाणी गटारातील सांडपाणी नेहमीच रस्त्यावर येते, त्यामुळे येथे नेहमीच दुर्गंधीचे साम्राज्य असते. त्यामुळे या मार्गावरून येजा करणारे पादचारी, वाहनचालक आणि या परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. 
      माणगांव ग्रामपंचायतीचे रुपांतर आता नगरपंचायती मध्ये झाले आहे. मात्र माणगांव शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणामुळे या शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजा, प्रश्न आणि समस्या दिवसेंदिवस जटिल होताना दिसत आहेत. 
     माणगांव शहरातील काही प्रभागात अद्याप शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या संदर्भातील बातम्या मिडियाच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत. नागरिकांच्या या समस्यांवर माणगांव नगरपंचायतीच्या माध्यमातून जेवढ्या मोठ्या आणि व्यापक प्रमाणात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती दिसून येत नाही. 
       तर दुसरीकडे माणगांव शहरातील निजामपूर रोडवरील रेल्वे ब्रीज खाली असलेल्या कचरा कुंडीच्या परिसरात या परिसरातील नागरिकांनी टाकलेल्या सुक्या व ओल्या कचऱ्यामुळे या ठिकाणी गटारातील सांडपाणी जाण्यासाठी असलेल्या गटारात प्लास्टिक पिशव्या, कचर्यातील छोट्या मोठ्या वस्तू अडकून ते गटार पुर्णपणे भरून गेले आहे. आणि या परिसरात प्रचंड घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र माणगांव नगरपंचायतीच्या माध्यमातून माणगांव शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणार्या विभागाचे आणि त्यांचे संनियंत्रण ठेवणाऱ्या माणगांव नगरपंचायतीने देखील या बाबीकडे अक्षम्य डोळेझाक केली आहे. की, या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी  उपाययोजना करण्यासाठी माणगांव नगरपंचायत पुर्णपणे हतबल झाली......   

          काही कळत नाही. परंतू ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारी आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या समस्येचे तात्काळ निवारण करावे अशी या परिसरातील त्रस्त नागरिकांची रास्त मागणी आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...