मुंबई उपनगर तायक्वांडो स्पर्धा-२०२१ यशस्वीरीत्या संपन्न !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
२० व्या मुंबई उपनगर तायक्वांडो जिल्हास्तरीय स्पर्धा १५ ते १७ ऑक्टो २०२१ पर्यंत धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाल्या. स्पर्धेचे आयोजन सिद्धकला तायक्वांडो अकादमीने राज्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडले. या स्पर्धेत एकूण ३१ संघासह ६०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत क्योरूगी व पुमसे वैयक्तिक, पेअर, ग्रुप, फ्री स्टाइल वैयक्तिक तसेच फ्री स्टाइल ग्रुप हे प्रकार घेण्यात आले व ८ वर्षांखालील लहान गट, सब ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर आणि सिनिअर गट खेळवण्यात आले. या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी उपलब्द होणार असल्याचे तायक्वांडो अकादमीचे प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांनी सांगितले. २० व्या मुंबई उपनगर तायक्वांडो संघटनेचे महासचिव संदीप ओंबासे यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. संदीप ओंबासे यांनी आयोजक सिद्धकला तायक्वांडो अकादमीचे तसेच मुंबई उपनगर जिल्हा सचिव जयेश वेल्हाळ यांचे कौतुक केले. या स्पर्धेत प्रथम विजेता संघ स्टार वन तायक्वांडो अकादमी प्रशिक्षक कल्पेश गोलांमबे, दुसऱ्या स्थानावर रेल्वे पोलीस तायक्वांडो अकादमी प्रशिक्षक अजय लोखंडे, तृतीय स्थान ओरीअर तायक्वांडो अकादमी, तर चौथे स्थान एकलव्य तायक्वांडो अकादमीने मिळवले. या विजेत्या संघांचा महाराष्ट्र ऑलम्पिक कमिटीचे महा सचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साह वर्धक असून येणाऱ्या काळात मुंबई उपनगरचे खेळाडू राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी नक्कीच करतील असा विश्वास नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे सचिव जयेश वेल्हाळ, स्पर्धा आयोजन कमिटीचे सभासद ज्योती हंकारे , विजय कांबळे, दिनेश डेरे, संतोष वस्त, आसिम सिंग सोडी, निशांत शिंदे, मुंबई उपनगर तायक्वांडो अध्यक्ष विनायक गायकवाड, दादोजी कोंडदेव पुरस्कृत भास्कर करकेरा आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment