Monday, 11 October 2021

लखीमपूर येथील शेतकरी हत्यांकाडांचा निषेध करत महाविकास आघाडी ची घोषणा बाजी, कल्याण, टिटवाळा, खडवली परिसरात बंदला चांगला प्रतिसाद !!

लखीमपूर येथील शेतकरी हत्यांकाडांचा निषेध करत महाविकास आघाडी ची घोषणा बाजी, कल्याण, टिटवाळा, खडवली परिसरात बंदला चांगला प्रतिसाद !!!


कल्याण, (संजय कांबळे) : यूपीतील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या अंदोलनात भाजपच्या मंत्र्यांच्या मुलाने गाडी घुसवून हिंसाचार घडविला होता. या विरोधात महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. या अनुषंगाने कल्याण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व काँग्रेस यांच्या नेत्यांनी गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र येवून रास्ता रोखो करून केंद्र व योगी सरकारचा निषेध व्यक्त करून प्रंचड घोषणा बाजी केली, दरम्यान आजच्या बंदला कल्याण ग्रामीण, टिटवाळा, खडवली आदी परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला.


गेली कित्येक महिने मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली येथे अंदोलन सुरु आहे. युपीतील लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या अंदोलनात भाजपच्या मंत्र्यांच्या मुलांने गाडी घुसविल्याने ४-५ शेतकऱ्यांचा जीव गेला होता तर या हिंसाचारात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. 


या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. त्यामुळे आज कल्याण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयराम मेहेर, शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, उपजिल्हा प्रमुख सदा सासे, यांच्या नेतृत्वाखाली कल्याण मुरबाड मार्गावरील गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी रास्ता रोखो अंदोलन करुन या हिंसाचार घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी योगी सरकार, हाय हाय, मोदी सरकारचा निषेध असो,शेतकरी विरोध सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.


या अंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जयराम मेहेर, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती, भरत गोंधळे, रविंद्र टेंभे, सरचिटणीस राम सुरोशे, सेवादलचे संतोष शेलार,ज्ञानेश्वर पाटील, तर शिवसेनेचे तालुका प्रमुख वसंत लोणे,उपजिल्हा प्रमुख सदा सासे, संचालक भूषण जाधव, कल्याण पंचायत समितीचे माझी उपसभापती रमेश बांगर, चंद्रकांत गायकर, शाहिद मुल्ला, वरप ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश कडू,प्रविण देशमुख, महेंद्र जाधव, नरेश सुरोशे,अविष जुवारी, नामदेव बुटोरे, नरेश सुरोशे,संतोष सुरोशे, तानाजी लोणे, विलास सोनवणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी, यांनी विंनती केल्याने अंदोलन कर्त्यानी कल्याण मुरबाड मार्ग मोकळा करून दिला .


दरम्यान आजच्या महाराष्ट्र बंदाला कल्याण ग्रामीण, टिटवाळा, खडवली परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...