Friday, 8 October 2021

श्रावण बाळ लाभार्थी यांना दिवाळीपूर्वी मानधन न दिल्यास महामोर्चा.. शेतमजूर युनियन तर्फे धरणे आंदोलनात इशारा !!

श्रावण बाळ लाभार्थी यांना दिवाळीपूर्वी मानधन न दिल्यास महामोर्चा.. शेतमजूर युनियन तर्फे धरणे आंदोलनात इशारा !!


चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार तर्फे भूमिहीन अल्पभूधारक विधवा वयोवृद्ध तसेच दिव्यांग व्यक्ती यांचेसाठी दरमहा एक हजार रुपये प्रमाणे मानधन श्रावण बाळ , संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी  आदी योजनान मार्फत दिले जाते. अत्यंत वयोवृद्ध निराधार व्यक्तींना जीवन जगण्यासाठी हाच मोठा आधार आहे  पण त्या रक्कमाचे गेल्या तीन महिन्यापासून शेतकरी शेतमजूर लाभार्थींना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक शारीरिक मानसिक हाल होत आहेत. म्हणून त्या रकमाचे मानधन दिवाळीचे आत ताबडतोबीने द्यावी. 


ऑक्टोबर महिन्याचे मानधन त्यात समावेश व्हावे ते 30 ऑक्टोबरच्या आत न दिल्यास 31 ऑक्टोबर 2021 रोजी चोपडा तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड लक्ष्मण शिंदे यांनी धरणे आंदोलनाचे समारोपात दिला.


याबाबत सविस्तर असे की श्रावण बाळ नंबर 1 व नंबर 2 संजय गांधी निराधार मानधन योजना, इंदिरा गांधी योजना, अंतर्गत विधवा दिव्यांग व 65 वर्षावरील शेतकरी शेतमजुरांना महाराष्ट्र शासन केंद्र शासन मार्फत मिळणारे मानधन गेल्या तीन महिन्यापासून मिळालेले नाही यामुळे या मूळ मागणीसह *सणासुदीचे दिवस लक्षात घेता इंदिरा गांधी राजवटीत सणासुदीला जसे रेशन धान्य दुकानातून गहू तांदूळ रवा मैदा तेल तू आधी जिनसा मिळत तशाच वस्तू रेशन कार्ड वर मिळाव्यात* 


या योजनांतर्गत मिळणारे मानधन दुप्पट करावे तेही दरमहा नियमित मिळायला पाहिजे प्यारालीसीस व दुर्धर आजारांचे उपचाराचे खाजगी सरकारी दवाखान्याचे कागदपत्र पाहून जिल्हा उप रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यातून वैद्यकीय दाखले मिळावेत आदी  मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रणित लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे चोपडा तहसीलदार कार्यालयावर आठ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन ठेवण्यात आले होते. त्या आंदोलनाचे निवेदन तहसीलदार गावित यांनी स्वीकारले व त्यांनी चर्चेत सांगितले की, पॅरालिसीस, एच आय व्ही आधी दुर्धर बाजारात असलेल्या लोकांना लाभ मानधन मिळावे म्हणून आरोग्य खात्यामार्फत जिल्हा उप रुग्णालय मार्फत माहिती गोळा करत असून त्यांना ते कसे सुलभतेने मानधन देता येईल याचा विचार करीत आहोत तसेच शासनाकडे मानधन रकमा मिळाव्यात म्हणून पाठपुरावा करीत आहोत असे  सांगितले.


या आंदोलनाचे नेतृत्व शेतमजूर युनियनचे नेते काम्रेड अमृत महाजन, गोरख वानखेडे, वासुदेव कोळी, हिराबाई सोनवणे, शशिकला निंबाळकर यांनी केले. या आंदोलनात सुमन बाई माळी, रेखाबाई भालेराव, एकनाथ सोनवणे, भागवत सुतार, नथू पाटील, निर्मला प्रकाश पाटील, संतोष खंडू माळी, जाहीरखा वजिरखा, सुधाकर  धनगर, काळु भवसिंग पारधी, निर्मला शिवाजी पाटील शशिकला देशमुख, शकुंतला देशमुख, सिंधुबाई देशमुख रत्‍नाबाई पाटील, वत्सला पाटील, कमलबाई भोगे, नबाबाई धनगर, लक्ष्मी बाई माळी, इंदुबाई सावळे, दगुबाई माळी, उषा नेटके, आत्माराम खंडू माळी, पंडित महाजन, रामलाल बळीराम पाटील, किशोर दगडू पाटील, छोटू धनसींग पाटील, आधार बडगुजर आदी लाभार्थी चोपडा, खाचणे, वर्डी, विर्वाडा, नगलवाडी, कुरवेल,  वढोदा, मोहिदा, आडावद अशा १० गावातुन आले होते..

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...