कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी सर्व प्रथम रायगडावर जाऊन केले छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन !!
बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : शासनाने महाराष्ट्रातील तीर्थ स्थळे, मंदीरे भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुली केली. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत माणगांव, महाडचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन करून किल्ले रायगड देखील शिवभक्तांसाठी खुला केला.
महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे नियम पाळण्याचे आदेश देत सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली केली आहेत, बाकी लोक इतर तीर्थक्षेत्र ठिकाणी जाऊन शुभकार्याची सुरुवात करतात, पण आम्ही आमच्या शुभकार्याचा शुभारंभ हा छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊनच करतो असे आमदार भरतशेठ गोगावले या वेळी म्हणाले. या पुढे आमदार भरतशेठ गोगावले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आज आपले देव, देश, धर्म आणि मंदिर सुरक्षित राहीली. त्या राजांच्या चरणी प्रथम नतमस्तक महाराष्ट्राची राजधानी किल्ले रायगड वर आज जाऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो आणि मी राजांना त्रिवार वंदन केले.
या वेळी उपस्थित संपर्क प्रमुख विजय सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक विभाग प्रमुख लहू अवकिरकर, उप सरपंच गणेश अवकिरकर आणि शिवभक्त इत्यादी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment