Friday 19 November 2021

महाराष्ट्रात सीएनजीचा खेळखंडोबा, कंपनी व पंपचालकांना बक्कळ पैसा कमविण्याची "दिशा" वेळेचा व पैशाचा अपव्ययामुळे वाहनचालकांची "दशा"?

महाराष्ट्रात सीएनजीचा खेळखंडोबा, कंपनी व पंपचालकांना बक्कळ पैसा कमविण्याची "दिशा" वेळेचा व पैशाचा अपव्ययामुळे वाहनचालकांची "दशा"?


कल्याण, (संजय कांबळे) : सतत वाढणाऱ्या महागाई वर पर्याय आणि प्रदूषिण विरहित इधंन म्हणून नावारूपाला येत असलेल्या सीएनजी पंपाचा सध्या राज्यात अक्षरशः खेळखंडोबा सुरू असून कंपनी व पंप चालक यांच्यातील समन्वयाचा अभाव यातून निर्माण होणारा गँसचा तुटवडा, तो भरण्यासाठी स्थानिक व बाहेर चा असा होणारा वाद, यातून जवळचा व ओळखीच्याला मधेच गँस भरण्यासाठी दिले जाणारे प्राधान्य, सुट्या पैशावरुन होणारी लुट दरातील चढ उतार, ऐवढे करुन लाईनमध्ये तीन चार तासांनंतर "सीएनजी संपलेला आहे" असा बघायला मिळणारा फलक ,या सर्वाचा वाहन चालकांना भयानक त्रास सहन करावा लागतो आहे, यातून वेळेचा व पैशाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. परंतु याचे कोणालाही सोयरसुतक नाही.


देशात दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या  किंमत वाढत आहेत, याचा परिणाम म्हणून सर्वच महागाई वाढली जाते. पेट्रोल व डिझेल च्या अतिवापरामुळे हवा वायू आणि जल यामध्ये प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. दररोज धावणाऱ्या लाखोंच्या संख्येने वाहनामुळे प्रदूषणात वाढच होत आहे.


यावर उपाय म्हणून सीएनजी हे इंधन समोर आले, कमी किमंत व प्रदूषण विरहित असल्याने जगभरातील अनेक कंपन्यांनी याच इधंनाच्या गाड्या बनविल्या व त्यांची विक्री ही अफाट झाली. त्यामुळे राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात कंपनीने सीएनजी पंप सुरू केले. २०१८मध्ये १४२४ असणारे पंप २०१९ मध्ये अजून नवीन ८ हजार २३१ पंपाला लाईसन्स देण्यात आले तर २०३०पर्यंत अजून १० हजार पंप चालू करणार असे पेट्रोलियम तथा प्राकृतिक गँस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते.


भारतात सीएनजी पंपाची एजन्सी देणाऱ्या ६ कंपन्या असून यामध्ये इंद्रप्रस्थ गँस लिमिटेड, महाराष्ट्र नँचरल गँस लिमिटेड, यूपी गँस लिमिटेड, महाराष्ट्र गँस लिमिटेड, गेल गँस लिमिटेड आणि वडोदरा गँस लिमिटेड अशा या कंपन्या असून पंप सुरू करण्यासाठी जागा असणे आवश्यक आहे, शिक्षण १०उतीर्ण, कंपनीकडे अनामत रक्कम म्हणून ३०/३५ लक्ष, सर्व बाधकांम व इतर बाबी मिळून १ करोडच्या आसपास खर्च अपेक्षित असतो.


केवळ महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नगर, औरंगाबाद, लातूर,आदी जिल्ह्यात मर्यादित पंप आहेत, परंतु यातील अनेक पंप केवळ नावापुरते आहेत, तर राज्यातील अनेक जिल्ह्यात सीएनजी चा पत्ताच नाही, सांगली, बीड, परभणी, अशा अनेक जिल्ह्यात सीएनजी नाही, कोल्हापूर , नाशिक, सातारा या जिल्ह्यात तर रात्री १२ पासून लाईन लाऊन केवळ ७०/८० गाड्या मध्ये सीएनजी भरला जातो, दुपारी एकनंतर कामकाज ठप्प होते, अनेक पंप चालक वाहन चालकांना गँस आहे किंवा नाही, किती पुरेल,टँकर कधी येणार, , येणार की नाही, याबद्दल समाधान कारक उत्तरे दिली जात नाही, यावरून कंपनी व पंपचालक यांच्या तील समन्वयाचा अभाव दिसून येतो. तर काही ठिकाणी कित्येक तास लाईन मध्ये थांबलेल्या वाहन चालकांना डावलून पंप चालकाच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या ओळखीच्या व्यक्तीस प्राधान्याने गँस भरुन दिला जातो, नाशिक पट्ट्यात तर आधीच गँसचा तुटवडा त्यात तो प्रथम स्थानिकांना द्यायचा की लांबून आलेल्या गाड्यांना द्यायचा यावरून वाद उफाळतो, अशा वेळी बिचारे वाहन चालक नाईलाजाने महागडे असे पेट्रोल भरून पुढे निघून जातात.

कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप येथील पंप पाईपलाईन खराब आहे म्हणून बंद आहे, तर वारणानगर येथील पंप लाईटबील भरले नसल्यामुळे गेल्या २ महिन्यापासून बंद असल्याची माहिती मिळते.ऐवढयानंतर एखाद्या ठिकाणी सीएनजी मिळालीच तर प्रत्येकाचे दर कमी जास्त ठरलेले, यातूनही वरचे ५/१० रुपये सुट्टे पैसे परत मिळणे म्हणजे कठीणच? अशा प्रकारचा सीएनजीचा खेळखंडोबा सर्व जिल्ह्यात सुरू असून प्रदूषण विरहित या इधंनाला दिवसेंदिवस मागणी वाढत असून यातून कंपनी व पंप चालक यांना बक्कळ पैसा कमावण्याची" दिशा" मिळाली असली तरी बिचा-या वाहन चालक याचा खर्च होणारा पैसा व वेळेचा अपव्यय यामुळे त्याची पुरती" दशा" झाली आहे याचा शासनाने गंभीरपणे विचार करावा.

No comments:

Post a Comment

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ वाटप !!

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ...