पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेत मागितली देशवासीयांची माफी.!!
भिवंडी, दिं,19, अरुण पाटील (कोपर) :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दिं 19) 9 वाजता देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी मोठी घोषणा केली. मोदींनी तिन्ही कृषी कायदे मागे घेणार असल्याचं जाहीर केलं. तसंच सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना करत मोदींनी माफीही मागितली आहे.
मी देशवासीयांची क्षमा मागतो आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही, असं मोदींनी जनतेला संबोधताना म्हटलं आहे. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला.
मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो की आमच्या तपस्येत काही कमी पडली असेल. आम्ही काही सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही, असं त्यांनी म्हटलं. पुढे मोदींनी म्हटलं की, आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासीयांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.या,नंतर आपण नवी सुरुवात करुया,असं म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. या महिन्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.
सुरुवातीला गुरु नानक यांनी महत्त्वाची शिकवण दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचं मोदी म्हणालेत. तसंच माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंत प्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment