पन्नासभर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या, कल्याण तालुका पोलिसांची कामगिरी, सर्वत्र कौतुक !!!
कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा अशा तिन्ही राज्यात धुमाकूळ घालणा-या अंत्यत शिताफीने गंभीर गुन्हे करणाऱ्या आणि वेळोवेळी पोलिसांना चकवा देणाऱ्या सराईत गुन्हेगारांस कल्याण तालुका पोलिसांनी अंत्यत हुशारीने जेरबंद केले असून त्यांने आतापर्यंत सुमारे ५० च्या जवळपास गुन्हे केले आहेत. त्याचे नाव गौरेश रघूनाध केरकर असे आहे.
महाराष्ट्रातील वागळे पोलीस ठाणे, वर्तकनगर, कापूरबावडी, शिवाजी नगर, कर्नाटकातील हुबळी, अशोकनगर, तर गोवा राज्यातील पणजी, म्हापसा, कलगुंड, परवरी, बिचोली, परनेम, पोंडा, लांजा आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गौरेश रघुनाथ केरकर उर्फ गावडे वय ३५ वर्षे रा. फरवरी, पणजी नार्थ गोवा, यांच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल होत. परंतु तो प्रत्येक वेळी पोलिसांना चकवा देत होता.
परंतु अनेक गुन्ह्यात सहभाग असलेला मुख्य आरोपी गौरेश रोहिदास केरकर ऊर्फ गावडे याचा वेळोवेळी शोध घेण्यात आला होता परंतु तो त्याचे वास्तव्य लपवित होता व तसे state wise त्याचे लोकेशन (गोवा, कर्नाटक) देखील प्राप्त झाले होते. नमूद आरोपीचे तसेच तो वावरत असलेल्या ठिकाणांवर Psi सुर्वे, पो.हवा. तुषार पाटील, पो.ना.दर्शन सावळे, पो.ना. नितीन विशे व पो.शि. योगेश वाघेरे हे जवळ-जवळ 2 महिन्यांपासुन त्याच्या मागावर होते.
आरोपी रोहिदास केरकर ऊर्फ गावडे वय 35 वर्षे रा. फरवरी, पणजी, नॉर्थ गोवा हा कामाठीपुरा, मुंबई येथे असल्याची माहिती प्राप्त झालेवरून तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्यास प्रचंड पाठलाग करून पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यास वरील नमूद 3 गुन्ह्यापैकी प्रथम Cr. no. 491/2021 u/s 392 IPC मध्ये आज रोजी अटक करण्यात आली असुन त्यांचेकडून वरील तिन्हीही गुन्ह्यातील गेला माल सु. 5 तोळे सोन्याची लगड ही हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीस उदईक रोजी मा. न्यायालयात PCR कामी हजर करून तसेच त्याचा इतर 2 गुन्ह्यात ताबा घेत आहे.
हा आरोपी हा 392 चे जबरी गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वी गुन्हा करते वेळी अनेकवेळा पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता.
आरोपीस महिने Surveillance वर ठेऊन त्यास पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी ही आमचे अधिपत्याखाली Psi सुर्वे, पो.हवा. तुषार पाटील, पो.ना. दर्शन सावळे, पो.ना. नितीन विशे व पो.शि. योगेश वाघेरे या पथकाने CDR, टॉवर लोकेशन, गुप्त बातमीदार याद्वारे सखोल तपास व परिश्रम करून केलेली आहे.
सदर आरोपीने ठाणे आयुक्तालयातील MFC पो.स्टे., खडकपाडा पो.स्टे., उल्हासनगर परिसर तसेच गोवा येथे अशाच प्रकारे IPC 392 प्रमाणेचे गुन्हे केले असले बाबत माहिती प्राप्त होत असून संबंधित पो.स्टे. यांना त्याबाबत कळविण्यात आले आहे.
दरम्यान या उल्लेखनीय कामगिरी बद्दल ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उप अधीक्षक श्रीमती स्मिता पाटील, एसडीओपी नाईक साहेब आदींनी कल्याण तालुका पोलिसांचे कौतुक केले आहे. तसेच जनतेमधूनही या कामगिरी बद्दल तालुका पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे. आता या कामगिरी बद्दल पोलीस व नागरिकांमध्ये उत्साह वाढला असून भविष्यात तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment