Tuesday 23 November 2021

अहिल्याबाई होळकर संस्था आणि आकृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सावित्रीच्या लेकी अंतर्गत विविध योजणांची जनजागृती !! "समाज परिवर्तनाचा उदय"

अहिल्याबाई होळकर संस्था आणि आकृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सावित्रीच्या लेकी अंतर्गत विविध योजणांची जनजागृती !! "समाज परिवर्तनाचा उदय"


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              अहिल्याबाई होळकर संस्था आणि आकृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सावित्रीच्या लेकी अंतर्गत समाजातील सर्व सामान्य लोकांना शासनमान्य विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून श्री संदिपकुमार नाचन व सौ. सरिता खेडेकर यांनी  विषेश परिश्रम केले. व्यसनमुक्ती केंद्र,कौशल्य, विकास प्रशिक्षण केंद्र, मुक्त शिक्षण केंद्र,पोळी भाजी केंद्र, वृद्धाश्रम केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र अशा दस सूत्री योजनाचा लाभ या संस्थेतर्फे मिळणार आहे.


         अशा संस्थेच्या ऑफिसचे  उद्घाटन बोरिवलीचे प्रसिद्ध संसदपटू खा. मा. गोपाळ शेट्टीसाहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने पार पडले. संस्थेंला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासनही  दिले. कुणबी समाजाचे श्री.मटकर, सेंनचुरेचे पारकर यांनी संस्थेला येणाऱ्या अडचणीत मदत करू असे या निमित्ताने मत व्यक्त केले.
      शिक्षण संस्थेच्या आध्यक्षा नगरसेविका सौ.संध्या दोषी यांनी शिक्षणाला लागणाऱ्या सुविधांच सहकार्य करेन अस सांगितल. सौ.बिना महाले यांनी महिलांच्या प्रकृतीबदल मागदर्शन करण्याचे दर्शवल. संगीतकार सौ. अमिता जोशी आणि एकपात्रीचे बादशाह श्री. सुरेश परांजपे यांनी आपापल्या कलेने उपस्थित शेकडो जनसमुदायस मंत्रमुग्ध केले. अशा बेरोजगार युवक युवतींना आत्मनिर्भर बनवणाऱ्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व विश्वस्त'. श्री. सुनील भोसले, सौ. मानसी राणे, श्री पांडुरंग शिंदे व सौ. शारदा विश्वकर्मा यांनी मोलाचे योगदान दिले.

No comments:

Post a Comment

आज ठाण्यात योगेंद्र यादव यांचे व्याख्यान !

आज ठाण्यात योगेंद्र यादव यांचे व्याख्यान ! ठाणे दि. ५ आज बुधवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात, सायं. ७ः३० वा. भारत जोडो अ...