Wednesday, 3 November 2021

लखिमपुर खिरी...शेतकरी हत्याकांड. ; "शेतकरी हुतात्मे अस्थिकलश अभिवादन यात्रा" .. ८नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातून ही जाणार !!

लखिमपुर खिरी...शेतकरी हत्याकांड. ; "शेतकरी  हुतात्मे अस्थिकलश अभिवादन यात्रा" .. ८नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातून ही जाणार !!


चोपडा, बातमीदार.. राष्ट्रीय किसान संघर्ष संयुक्त संघर्ष मोर्चा.. किसान सभातर्फे आयोजित या अभिवादन यात्रेत आदिवासी महासभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना लोक संघर्ष मोर्चा व तमाम मार्क्स, शाहू, फुले, आंबेडकर लाल बावटा शेतमजूर युनियन, संविधान बचाव संघटना सहभागी होणार आहेत. यासाठी तनमनधनाने सहकार्य करावी व सामील व्हावे ! असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
   

याबाबत सविस्तर असे की.. उत्तर प्रदेशातील लखीमपुर-खीरी या गावी गेल्या तीन ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा व राज्याचे उपमुख्य मंत्री केशवप्रसाद मौर्य यांना दिल्ली येथे मोदी सरकारने लादलेल्या तीन कृषी कायदे रद्द करा या मागणीचे शेतकरी आंदोलकांचे निवेदन देण्यासाठी जमले असता केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय सिंह मिश्रा यांचे मुलाने निर्दयपणे गाडी चालवली व त्यात चार शेतकरी शहीद झाले.. सात शेतकरी दवाखान्यामध्ये प्राण वाचवण्यासाठी झुंज देत आहेत. चिडलेल्या शेतकऱ्यांनी गाडीतील तीन गुंडांना मार मारले वास्तविक ११ महिनेपासून चाललेल्या शांतता पूर्ण आंदोलनात हे घडायला  नको होते.. परंतु गेल्या अकरा महिन्यापासून शेतकरी थंडी ऊन वारा पाऊस अंगावर घेऊन मोदी सरकारने लादलेले तीन शेतकरी कायदे रद्द करावेत म्हणून संघर्ष करीत आहेत. त्यांना खालिस्तानी देशद्रोही म्हणण्यापर्यंत भाजपा  नेत्यांनी मजल गेली आहे त्यातून निर्माण झालेल्या असम्हिषणूतेतून अशी माथेफिरू घटना घडली. मोदी सरकारने कायदे रद्द केले असते वा शेतकऱ्यानचे म्हणणे ऐकले असते हे कृत्य घडले नसते. पण कॉर्पोरेट घराण्यांचे दबावाखाली मोदी सरकार काम करीत आहे त्यांचेच भल्यासाठी सरकारने कृषी कायदे केलेले आहेत म्हणून शेतकऱ्यांमध्ये चीड आहे. या आंदोलनातील ४ शहीदांच्या अस्थींची कलश यात्रा भारतभर सुरू असून ती जळगाव जिल्ह्यातही 8 नोव्हेंबर रोजी येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ मैदान जवळ सकाळी ९ वाजता अभिवादन सभा घेण्यात येणार आहे तेथून अभिवादन यात्रा निघून ममुराबाद इदगाव मार्गे धानोरा अडावद चोपडा. वरून दहिवद, पातोंडा, अमळनेर, मालखेड, वाळकी मार्गे वढोदा, मोहीदा वरून होलनानथा, हिसाले, धुळे जिल्हात जाणार आहे. या अभिवादन यात्रेस भा. क. प. चे राज्य सहसचिव राजू देसले, नासिक आत्माराम विशे, ठाणे ॲड. हिरालाल परदेशी, धुळे सूर्याजी शिंदे, सुनील पाटील हे या यात्रेत सहभागी आहेत तरी ठिकठिकाणी अभिवादन करण्यासाठी शेतकरी शेतमजूर यांनी यावे असे आवाहन आयोजक सर्वश्री. कॉम्रेड अमृत महाजन माजी जि. प. सदस्य शिवाजी पाटील, भा. क. प. जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे ,शांताराम पाटील, गोरख वानखेडे वासुदेव कोळी ,मनीलाल पाटील, धोंडू पाटील, बाळू पाटील, चंद्रकांत माळी, किशोर पाटील, योगराज पाटील भगीरथ पाटील, निलेश पाटील, अरमान तडवी, शिवाजी पाटील, विनोद आढळके, कालू कोळी ,सुरेश माळी, रमेश माळी, सुरेश नागदेव, रतीलाल बाविस्कर, सुकदेव भील, नारायण कोळी, बापू माळी, अशोक संदानशिव,  युवराज माळी, पिंटू पाटील, वणा माळी, निंबाजी बोरसे,  अभिमन पाटील आदीनी केली आहे.


No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...