Wednesday 24 November 2021

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाड्यांना चढतोय गंज, तेहतीस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन गाड्या ?

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाड्यांना चढतोय गंज, तेहतीस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन गाड्या ?

कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सोईसुविधाची वाणवा असल्याची ओरड होत असतानाच अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राना देण्यात आलेल्या १०२ या शासकीय गाड्यांंना सध्या गंज चढू लागला असून जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्राना लवकरच नवीन गाड्या मिळणार असल्याची माहिती मिळते आहे, त्यामुळे आता तरी नागरिकांना वेळेत चांगले उपचार मिळतील अशी अपेक्षा आहे.


ठाणे जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत व शेकडो उपकेंद्र असून कोरोनाच्या काळात यांच्या सह अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर, यांनी भरीव असे काम केले. जिल्ह्यातील बहुतांश भाग हा शहरी व ग्रामीण भागात मोडला जातो. आजही अनेक वाड्यावसत्यामध्ये आरोग्याच्या सोईसुविधा मिळत नाही, रस्त्या अभावी तेथे रुग्ण वाहिका पोहचत नसल्याने आदिवासी महिलांची प्रसूती रस्त्यावर किंवा बैलगाडीत घडल्या च्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये कित्येक वेळा यांचा उपचारा अभावी त्यांचा मृत्यू देखील झाले ला असल्याची उदाहरणे आहेत.

प्रत्येक नागरिकांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावा, पेंशट ना इकडून तिकडे उपचारासाठी नेण्यात यावे, एखाद्या अवघड परिस्थितीत पेंशट पर्यंत पोहता यावे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना एखाद्या गावात जलद पोहचता यावे.

या सारख्या अनेक कामासाठी शासनाने आरोग्य केंद्राना १०२ च्या शासकीय गाड्या/ वाहने दिली आहेत, परंतु ती नादुरुस्त किंवा इतर कारणामुळे आज भंगारात गेली आहेत, त्यांना 'गंज' चढू लागला आहे. जिल्ह्यातील शिवळे, किशोर, टेंभा, आणि शिरोसी ,मांगरुळ येथील केंद्रात अशा गाड्या दिसून येत आहेत.

या बाबतीत आरोग्य विभागातून माहिती घेतली असता समजले की, जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्राना वाहने पुरविण्यात आली आहेत. शासनाकडून ९ गाड्या मिळाल्या असून नादुरुस्त झालेल्या बदलापूर केंद्रास नवीन गाडी देण्यात आली आहे. तर शहापूर तालुक्यास आमदार दौलत दरोडा यांच्या आमदार निधीतून ९ गाड्या, कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या निधीतून निळजे प्राथमिक केंद्रास ,तसेच उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ, वरप, कांबा या गावासाठी ३ छोट्या (ईको) गाड्या साठी निधी दिला आहे. तर भिवंडी मधील पडघा केंद्राकरिता आ. मोरे यांनी 'कार्डीयर' रुग्णवाहिका दिली आहे. परंतु मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्याच्या पदरात काही पडले नसल्याचे समजते.

दरम्यान गंज चढू लागलेल्या गाड्यांच्या बाबतीत विचारले असता समजले की, ठाणे येथे गाड्या उभ्या करण्यासाठी जागा नसल्याने त्या संबंधित केंद्रात उभ्या केलेल्या आहेत, त्या लवकरच उचलण्यात येणार असून नवीन दिलेल्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनांना चालक देखील देण्यात आली आहे असे नाव न छापण्याच्या अटींवर आरोग्य कर्मचारी यांनी सांगितले

मागील दोन चार दिवसापूर्वी मुरबाड मधील ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात तील गैरसोय व सुविधा मिळत नसलेबाबत अंदोलन केले होते.. त्यामुळे आता तरी ग्रामीण भागातील गोरगरीब, आदिवासी बांधव यांना तातडीने आरोग्य सुविधा मिळतील अशी अपेक्षा करुयात.

No comments:

Post a Comment

साक्ष फाउंडेशनकडून गरजू मुला-मुलींना नवीन ड्रेस वाटपसाजरी झाली माणुसकीची दिवाळी !!

साक्ष फाउंडेशनकडून गरजू मुला-मुलींना नवीन ड्रेस वाटप साजरी झाली माणुसकीची दिवाळी !! कोल्हापूर, प्रतिनिधी : साक्ष फाउंडेशनकडून मा...