महिला कांग्रेसचे महागाई विरोधात धरणे आंदोलन !!
कल्याण, ऋषिकेश चौधरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या आदेशानुसार कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कल्याण डोंबिवली महिला काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात जनजागरण अभियान अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले. ह्या वेळी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी सांगितले की, गोरगरीब जनतेला खोटी प्रलोभने देऊन मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि घरगुती गॅस यांच्या किमतीत झपाट्याने भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. ह्या किमतीत अशीच वाढ होत राहिली तर गोरगरीब जनतेचे जगणे मुश्किल होत आहे. केंद्र सरकारने त्वरित पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि घरगुती गॅस यांच्या किमती कमी कराव्यात त्याकरिता संपूर्ण महाराष्टात प्रदेश अध्यक्ष नान पटोले यांच्या आदेशाने जनजागरण अभियान चालू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण मध्येही वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
ह्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस आणि कल्याण जिल्हा प्रभारी नीता त्रिवेदी, महाराष्ट्र प्रदेश सचिव ब्रिजकिशोर दत्त, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, विमल ठक्कर, शकील खान, अजय पोळकर, शबाना शेख, वैशाली वाघ, वर्षा गुजर, शिला भोसले, सुरेखा ठाकूर, दीप्ती दोषी आदी कल्याण डोंबिवली काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment