कॉमरेड गोविंद पानसरे यांची ८८ वी जयंती साजरा !!
चोपडा, बातमीदार.. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव व ख्यातनाम डावे विचारवंत शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांची दिनांक २४ नोव्हेंबर रोजी ८८ वी जयंती भारतिय कम्युनिस्ट पक्षातर्फे तर्फे साजरी करण्यात आली.
त्यावेळी पानसरे यांचे प्रतिमेस डॉक्टर अमोल पवार यांच्या हस्ते माळा अर्पण करण्यात आली कॉम्रेड पानसरे कोल्हापूर येथील ख्यातनाम डावे विचारवंत 'वकील व शिवाजी' कोण होता या जगातील अनेक भाषांत प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक होते सनातनी विचारांच्या माथेफिरूनी त्यांची मॉर्निग वॉक करताना हत्या केली त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष करीत आहे अस कॉम्रेड अमृत महाजन, शांताराम पाटील, लेनिन महाजन यांनी जयंती साजरी केल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे
No comments:
Post a Comment