Thursday 25 November 2021

कल्याण पंचायत समितीच्या बैठकीस वारंवार गैरहजर राहणाऱ्या विद्यूत कंपनीला फटकारले, जिल्हाधिका-याकडे तक्रार?

कल्याण पंचायत समितीच्या बैठकीस वारंवार गैरहजर राहणाऱ्या विद्यूत कंपनीला फटकारले, जिल्हाधिका-याकडे तक्रार?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या मासिक सभेस वारंवार 'दांडी 'मारणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीला सभापती, उपसभापती, व सदस्यांनी चांगलेच फटकारले असून त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सुतोवाच गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी दिले आहे.


पंचायत समितीची निर्मिती ही पंचायत राज व्यवस्थेतून झालेली आहे, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणून पंचायत समिती काम करते, तसेच तालुका पातळीवर विकास केंद्र म्हणून ही पंचायत समितीकडे पाहिले जाते, पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार सभेचे काही नियम आहेत, यामध्ये लोकप्रतिनिधीच्या मासिक सभेस प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना सभेस बोलावण्याची / कळवण्याची तरतूद आहे, यामागील उद्देश इतकाच असतो की, तालुक्यात काही अडचणी, समस्या, प्रश्न, विकास कामे याबाबतीत सोडवणूक व्हावी.

त्यानुसार कल्याण पंचायत समितीच्या १५/११/ २०२१ च्या तहकूब सभेची सभा आज घेण्यात आली होती. यासाठी सभापती अनिता वाकचोरे, उपसभापती भरत भोईर, सदस्य, यशवंत दळवी, रमेश बांगर, सदस्यां रंजना केतन देशमुख, अस्मिता अजय जाधव, भारती रवींद्र टेंभे, रेश्मा भोईर आदी उपस्थित होते.

प्रथम उपसभापती भरत भोईर यांच्या अभिनंदनांचा ठराव सदस्य रमेश बांगर यांनी मांंडला तो मंजूर झाल्याने प्रशासनातर्फे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी नवनिर्वाचित उपसभापती भरत भोईर यांचे अभिनंदन केले. यानंतर कृषी विभागाचे अधिकारी संत यांनी आपल्या विभागाचा अहवाल वाचन केले व विविध योजनाची माहिती दिली.

माझी सभापती रंजना देशमुख यांनी म्हारळ गावासाठी मिनी बस सुरू करावी अशी मागणी केली, याला सदस्यां अस्मिता जाधव यांनी सहमत दर्शवली, यानंतर बांधकाम, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, बालविकास, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, आरोग्य आदी विभागप्रमुखांना आपआपल्या विभागाची माहिती सभेपुढे ठेवली, यातूनच सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यूत वितरण कंपनी विरोधात सर्व सदस्य आक्रमक झाले, कारण तालुक्यात वाढीव वीजबिल, वांरवार खंडित विजपुरवठा, कृषीपंप जोडण्या, जिर्णजुनाट लोंबकळणा-या तारा, यामुळे होणारे अपघात आदी विविध प्रकारचे प्रश्न, अडचणी, समस्या असताना या विभागाचे मात्र कोणीही आजच्या सभेला उपस्थित नव्हते, त्यामुळे सर्व सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां विरोधात कारवाई साठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्रव्यवहार करण्यास सांगण्यात आले. या संदर्भात कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा सभेचे सचिव अशोक भवारी यांना विचारले असता, त्यांनी या वृताला दुजोरा दिला.

No comments:

Post a Comment

चांगले उद्योग गुजरातला आणि विनाशकारी रिफायनरी राजापुरला ? - उध्दव ठाकरे

चांगले उद्योग गुजरातला आणि विनाशकारी रिफायनरी राजापुरला? उद्योग मंत्र्यांनी स्वतः च्या जिल्ह्यात किती प्रकल्प आणले - कोकणचे भविष्य गुंडांच्य...