शिर्डी संस्थानच्या अनागोंदी कारभारा विरोधात दिगंबर कोते पाटील यांचे उपोषण !!
*कोकण विभाग पत्रकार संघाचे शिष्टमंडळ शिर्डी येथे रवाना, उपोषणास जाहीर पाठिंबा*...*
मुरबाड, श्याम राऊत : *शिर्डी* *साई संस्थान मध्ये देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी ज्या सुविधा पुर्वि उपलब्ध होत्या. त्या सुविधा आता बंद झालेल्या आहेत. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. त्या सुविधा पुन्हा सुरू कराव्यात याकरिता शिर्डी येथीस पञकार व माहीती कार्यकर्ते समाज दिगंबर कोते पाटील हे गेले चार दिवसापासून उपोषणास बसले आहेत.त्यांना पाठींबा देण्यासाठी कोकण विभाग पञकार संघाचे शिष्टमंडळाने शिर्डी येते जाऊन सदरच्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे* .
*शिर्डी संस्थानच्या अनागोंदी कारभारा विरोधात पञकार व माहीती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते पाटील हे दिनांक 18 नोव्हेंबर पासून साईबाबा मंदीर जवळ उपोषणास बसले असून या उपोषणास कोकण विभाग पञकार संघाने पाठींबा दिला आहे . कोकण विभाग पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांच्या सुचने नुसार, संघाचे कोकण विभागीय निरिक्षक साई भक्त गोपाळ पवार, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकर, प्रदेश खजिनदार श्याम राऊत, मुरबाड तालुका उपाध्यक्ष अरुण ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्ते कोते यांच्याशी चर्चा करून जो पर्यंत भाविकांना मागील सुविधा पूर्ववत होत नाहीत आणि नवीन मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत कोकण विभाग पत्रकार संघ उपोषणकर्ते यांच्या पाठीशी ठाम असणार अशा शब्दात विभागीय निरीक्षक साई गोपाळ पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी रवींद्र वाघ शिर्डी, संजय नवलपुरे शिर्डी यांनी कोकण विभाग पञकार संघाच्या पदाधिका-यांचे आभार मानले* .
हार्दिक आभार
ReplyDelete