Sunday 21 November 2021

कल्याण डोंबिवली पालिकेचा भोंगळ कारभार जागा ताब्यात नसतानाही स्वच्छतागृहाचे काम घेतले हाती कारवाईची मागणी सुशीलकुमार सीताराम पायाळ मोहाने टिटवाळा मंडळाचे सचिव भारतीय जनता पार्टी यांनी पालिका आयुक्तांना कडे केली..

कल्याण डोंबिवली पालिकेचा भोंगळ कारभार जागा ताब्यात नसतानाही स्वच्छतागृहाचे काम घेतले हाती कारवाईची मागणी सुशीलकुमार सीताराम पायाळ मोहाने टिटवाळा मंडळाचे सचिव भारतीय जनता पार्टी यांनी पालिका आयुक्तांना कडे केली..


कल्याण, ऋषिकेश चौधरी : प्रभाग क्र. १४ मोहोने कोळीवाडा या प्रभागातील लहूजी नगर भागात पालिका प्रशासनाने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत बहुमजली स्वच्छतागृह बांधले आहे. 


परंतु एन.आर.सी. कंपनीच्या वादामुळे आणि त्यांनी मा. न्यायालयात दावा दाखल केल्यामुळे काम बंद पाडले आहे तरी आपण प्रशासन आहात आपण जर ठरवले तर स्वच्छतागृहाचे काम आपण पूर्ण करू शकतो. त्या दरम्यान एन.आर.सी. समूहाने मोहने येथील पूर्ण प्रकल्प अडाणी समूहाला हस्तांतरित केलेला आहे असे समजते आणि अडाणी समूह महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना राहत्या वसाहती आणि कंपनी मधील पूर्ण बांधकाम जमीनदोस्त करत सुटले आहेत त्यातच अशी जनतेमध्ये कुजबुज आहे की मग जर अडाणी समूहाने या बहुमजली स्वच्छतागृहांची पण अशीच अवस्था केली तर इतक्या मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेला निधी वाया जाऊन जनतेच्या पैशाची माती होईल. आणि असेच जर झाले तर मग या सर्व प्रकाराला कोण जवाबदार होत त्यांना कडक शासन करून त्यांच्या कडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून घ्यावी. तरी मा. आयुक्त या गंभीर विषयाची पूर्ण चौकशी करून तात्काळ उपाय योजना करावे अशी मागणी भाजप मोहने टिटवाळा मंडळाचे सचिव सुशीलकुमार सीताराम पायाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. स्वच्छतागृहांच्या पूर्णत्वाला गती देवून नागरिकांच्या होणाऱ्या हाल अपेष्टा दूर झाल्या नाहीतर मग जनतेसाठी शेवटचा मार्ग उरेल तो म्हणजे घटनेने दिलेला अधिकार "आंदोलन". असा इशारा देखील यावेळी पायाळ यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे..


No comments:

Post a Comment

आशालता रामनाथ वडके यांचे निधन !

आशालता रामनाथ वडके यांचे निधन ! मुंबई (प्रतिनिधी) :            मझगाव मुरुड जंजिरा जि. रायगडच्या राहिवाशी व हुतात्मा कमलाकर दांडे...