कल्याण तालुक्यात अखेरीस बिबट्याचे अस्तित्व सिध्द, ट्रँपिंग कँमे-यात कैद, नागरिकांनी काळजी घेण्याचे अवाहन !!
कल्याण, (संजय कांबळे) : गेली कित्येक दिवस वाघ अर्थात बिबट्या येथे दिसला, तेथे दिसला, इतके कुत्रे खाले? तो मंदिरात आला होता, अशा एक ना शेकडो मानवनिर्मित कथानकाने वनविभागासह गावातील तरुण मंडळी व सामाजिक कार्यकर्ते अक्षरशः वैतागून गेले होते परंतु बिबट्या चे खरेपण विश्वास ठेवण्यालायक आढळून येत नव्हते. पण अखेरीस वसत येथील जंगलात लावण्यात आलेल्या ट्रँपिंग कँमे-यात तो कैद झाल्याने त्याचे तालुक्यातील अस्तित्व सिद्ध झाले असून नागरिकांना व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन कल्याण वनविभागाने केले आहे.
कल्याण तालुक्यातील गोवेली ठाकूपाडा येथे बिबट्या दिसल्या ची वार्ता पहिल्यांदा समोर आली, तेथील दशरथ चोरगे यांच्या सीसीटीव्ही कॅमेरेत तो कैद झाल्याचेही सांगण्यात आले,तोपर्यंत तो रायते, नांलिबी येथे दिसल्याचे वेगवेगळ्या लोकांनकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार वनविभागा काही पुरावा, ठसे मिळतात का याची पाहणी करीत होते,पण काही आढळून येत नव्हते, अशातच चोरगे यांच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला नसल्याचे त्यांच्या मुलांने सांंगितल्याने या अफवा आहेत, असे प्रथमदर्शनी समोर आले, यानंतर तो रायते येथील मंदिरात आला होता, दहागाव रस्त्यावर डंपर चालकाला दिसला, अशा अफवांची भर पडली.त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी देखील कंटाळून गेले, रोज कोणी ना कोणी बिबट्या अमुक ठिकाणी दिसला असे वनविभागाला कळवित होते. पण काही पुरावा मिळुन येत नव्हता. तरीही वनविभाग सतर्क होता ,यांच्या जोडीला रायते येथील सामाजिक कार्यकर्ते राम सुरोशे, विलास सोनावणे, हेही जागृतपणे यावर लक्ष ठेवून होते,
बिबट्या दिसल्याच्या घटनेला १५/२० दिवस झाले तरी त्यांने काही अपघात केल्याचे दिसून येत नव्हते, त्यामुळे बिबट्या आहे की नाही याबाबत शंका, प्रश्न, विविध चर्चा उपस्थित होत होत्या. लांडगा आला रे आला, असे व्हायला नको म्हणून कल्याण वनविभागाचे खडवली, दहागाव, कुंदा आणि कल्याण असे चारही राउंड चे कर्मचारी रात्रंदिवस लक्ष ठेवून होते.
ऐन दिवाळीच्या दिवसात कांबा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पठार पाडा येथे तीन बिबटे आले आहेत, तेथील लोकांनी त्याला पिटाळून लावले आहे, ते नानेपाडा गावाच्या दिशेने गेले आहेत अशी माहिती समोर आली. तोपर्यंत वनविभागाने लोकांनी सावध रहावे, काळजी घ्यावी, जंगलात जाऊ नये, काय खबरदारी ?घ्यावी या संदर्भात नांलिबी, पठार पाडा, वसत, वाघेरापाडा येथील ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या, त्यामुळे नागरिक सावध झाले होते. याचवेळी वसत गावातील गुरुनाथ माळी यांनी त्यांच्या तबेल्यासमोरील झाडाच्या मुळीला बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला जंगलात फरफट नेले असल्याची घटना घडली, शिवाय पठारपाडा येथे कुत्रा खाल्याचे समोर आल्याने वनविभाग सतर्क झाला, स्वतः रेंज आँफिसर श्री चन्ने हे या भागात फिरून माहिती घेऊन लक्ष ठेवून होते.त्यामुळे या घटनेमुळे वसत येथील वासरु फरफट नेलें होते. त्या ठिकाणी ३ ट्रँपिंग कँमेरे लावण्यात आले होते.ते दुसऱ्या दिवशी तपासले असता त्यामध्ये बिबट्याचे २०/३० फोटो आले असून आता मात्र कल्याण तालुका परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे इतक्या दिवसांच्या उलटसुलट चर्चेला आता पुर्णविराम मिळाला असून लोकांनी जंगलात एकट्याने जाऊ नये, फटाके वाजवावेत, स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी असे अवाहन कल्याण वनविभागाने केले आहे.
No comments:
Post a Comment