Saturday 20 November 2021

मुरबाड तालुक्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची वैचारिक बैठक संपन्न ..!!

मुरबाड तालुक्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची वैचारिक बैठक संपन्न ..!!


मुरबाड, (मंगल डोंगरे) :
 
गेली वर्षानुवर्षे ओबीसींना त्यांच्या संविधानिक हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे काम प्रस्थापित व्यवस्थेकडून सुरु आहे आणि त्याच्या विरोधात गेली अनेक वर्षे अनेक ओबीसी संघटनां बरोबरच राष्ट्रीय ओबीसी महासंघ लढा लढत आहेत. 


आज संपूर्ण देशभरात ओबीसी समाजाला त्यांच्या हक्क आणि अधिकारांप्रती जागरूक करण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे शिलेदार मोठ्या जोमाने करत आहेत. 


त्याचाच एक भाग म्हणून आज कुणबी समाज हॉल मुरबाड येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा युवाध्यक्ष तथा ओबीसी संघटक श्री. उमेशजी पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रमुख ओबीसी बांधवांशी संवाद साधून वैचारिक बैठक संपन्न झाली. 

सभेमध्ये राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे सर यांनी ओबीसींवर होणारे अन्याय आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आजपर्यंत या ओबीसी लढ्यामधील योगदान, ओबीसींच्या भरविलेल्या परिषदा याबद्दल उपस्थित ओबीसी बांधवांना माहिती दिली. त्याच बरोबर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची संरचना म्हणजे जनरल कक्ष, कर्मचारी अधिकारी कक्ष,युवा कक्ष, महिला कक्ष, विद्यार्थी कक्ष याबद्दल माहिती दिली. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात मुरबाड तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरजी विशे सर यांनी आपर्यंत कोणतेही सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना का करत नाही? प्रस्तापित व्यवस्थेला ओबीसींची एवढी भीती का वाटते? ओबीसींपुढे भविष्यात येणाऱ्या समस्या त्याचबरोबर ओबीसी बांधवांनी कशाप्रकारे एकजूट होऊन हा लढा उभा केला पाहिजे आणि संघटन मजबूत होण्यासाठी कशाप्रकारे रणनीती आखली पाहिजे यावर प्रकाश टाकून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि पुढे होऊ घातलेल्या ओबीसी केडर कॅम्प संदर्भात माहिती दिली.त्याच बरोबर उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.

येणाऱ्या पुढच्या काळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विविध कक्ष स्थापन होत आहेत त्यामध्ये आपण जबाबदारी घेऊन या लढ्यात आपले योगदान द्यावे आणि पुढे होणाऱ्या ओबीसी केडर कॅम्प मध्ये नावनोंदणी करून सामिल व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाशजी पवार सर यांनी उपस्थित ओबीसी बांधवांनी केले. येणाऱ्या पुढील काळात राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत काम करून हा लढा नेटाने पुढे नेऊ असे आश्वासन उपस्थित बांधवांनी दिले. 

या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी कक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश माळी, जिल्हा सहसचिव श्री भालचंद्र गोडाबे सर, तालुका अध्यक्ष मिलिंदजी मडके, कर्मचारी-अधिकारी कक्षाचे तालुका अध्यक्ष श्री. नितिन राणे सर, तालुका सचिव सोपान गोल्हे सर, युवाध्यक्ष किरण दळवी तसेच कुणबी समाजोन्नती संघ मुरबाड चे माजी अध्यक्ष श्री. विशे तात्या, S.T. को ऑप. मुंबई बँकेचे संचालक श्री. दशरथ विशे साहेब, श्री. दिपकजी घुडे साहेब, श्री. तुकाराम ग़ोल्हे सर, श्री. प्रकाश सोनवळे, श्री. सदाशिव कुंभार, श्री. सज्जन रोठे ,मनिष बिडवी, डॉ. प्रमोद पोगेरे सर, श्री. मयूर रोठे ,श्री. नरेश रायकर, श्री. बाळू खंडागळे, श्री. यादव पवार सर, श्री. विनोद कोर सर, श्री. दशरथ इसामे सर, श्री. दिलीप इसामे सर, श्री. राजेंद्र बांगर, श्री. नामदेव हरड सर, श्री. उत्तम सुरोशे श्री. चिंतामण शेलवले, श्री. एन एन.गायकर, राजेंद्र पाटील सर, श्री.अभिजित खडकबाण, महेश रायकर, काशीनाथ केदार, सुहास केंबारी, चंद्रकांत साबळे इ. 

महिला प्रतिनिधी म्हणून सौ. सुवर्णाताई ठाकरे, सौ. शिल्पाताई देहेरकर, सौ. ज्योतीताई गोडांबे, सौ. रंजना डोहळे, सौ. संध्या कदम, सौ. अरुणा वारघडे, सौ. कल्पना सुरोशे, सौ. कल्पना पवार, सौ. अपर्णा गडे, सौ. शारदा लाटे, सौ. सुरेखा गायकर इ. 

पत्रकार श्री.एस एल पाटील,श्री.दिलीप पवार,श्री.अनंत घागस, श्री.अरुण ठाकरे, श्री.नरेश म्हाडसे इ. त्याचबरोबर कुणबी, आगरी, वैश्य वाणी, कुंभार, नाभिक, सोनार समाज प्रतिनिधी तसेच ओबीसी समाजातील प्रतिष्टीत व्यक्ती आणि महिला उपस्थीत होत्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रकाशजी पवार सर यांनी केले, सूत्रसंचालन श्री.सोपान गोल्हे सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.नितीन राणे सर यांनी केले.

No comments:

Post a Comment

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ वाटप !!

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ...