केंद्राकडून कृषी कायदे मागे घेतल्याने अण्णानी मानले PM मोदींचे आभार तर विरोधकांना टोला.!
---------------------------------------------------------
भिवंडी, दिं,20, अरुण पाटील (कोपर) :
केंद्रातील मोदी सरकारने देशात तीन कृषी कायदे आणले होते. त्यानंतर कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतक-यांचे आंदोलन सुरू होते. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेले तीन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. यावरुन सर्वत्र प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत. मोदींच्या घोषणेनंतर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आभार मानत विरोधकांना टोला मारला आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, ‘केंद्र सरकारने तीन कृषी कायदे परत घेतले, त्याचा आनंद आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल अशी आशा अण्णांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी शेतमालाला खर्चावर आधारित दर मिळावा यासाठी 600 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. या शेतकऱ्यांचं ऋण कायम लक्षात राहिल, असं देखील अण्णांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे 3 कृषी कायदे रद्द झाले आहेत. याचं संपूर्ण श्रेय शेतकऱ्यांचं आहे. विरोधीपक्षाचं श्रेय नाही, असं म्हणत अण्णांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच, देशाला आंदोलनाचा इतिहास आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. आंदोलन हा पर्याय आहे. शेतकऱ्यांनी देशभर केलेल्या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागल्याचंही अण्णा यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment