Saturday, 20 November 2021

अविनाश सकुंडे यांची १२२ देशात काम करणाऱ्या अंतरराष्ट्रीय संस्थेवर आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीवर नेमणूक !!

अविनाश सकुंडे यांची १२२ देशात काम करणाऱ्या अंतरराष्ट्रीय संस्थेवर आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीवर नेमणूक !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
        भारतीय महाक्रांती सेना ही पक्षविरहीत सामाजिक संघटना असून तिचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरु आहे. भा.म.सेना राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना राष्ट्रीय अध्यक्ष सन्मा. अविनाश सकुंडे यांची जागतिक पातळीवर आरोग्य व सामाजिक शांतता या साठी केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून " International Youth Development Council " १२२ देशात काम करणाऱ्या  अंतरराष्ट्रीय संस्थेवर आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच मलेशिया येथे होणाऱ्या संघटनेच्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण या माध्यमातून संकुडे यांना देण्यात आले आहे. अविनाश संकुडे यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या या निवडीमुळे त्यांना अनेक संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघ, संस्था यांच्यातर्फे अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...