मुंबईत धडकण्यापूर्वीच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या टोल नाक्यावर गाड्या आडवून पोलिसांनी घेतलं ताब्यात.!!
भिवंडी, दिं,20, अरुण पाटील (कोपर) :
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. संपकरी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यातच राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे राज्यभरातील संपकरी कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मुंबईच्या प्रवेशद्वारावर येण्यापूर्वीच या कर्मचाऱ्यांना रोखले जात आहे.
मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी राज्यभरातून येत आहेत. मात्र, मुंबईच्या प्रवेशद्वाराराव पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्यापासून रोखलं जात आहे. टोल नाक्यावर पोलिकांकडून गाड्यांची तपासणी करण्यात येत असून एसटी कर्मचाऱ्यांना रोखून ताब्यात घेतलं जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे गेले 11 दिवस आझाद मैदान येथे एसटीचे राज्यसरकारमध्ये विलिगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ही आमच्यासाठी अंतिम लढाई आहे, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत येथुन जाणार नाही. तसेच एसटीच्या खाजगीकरणाला आमचा विरोध असेल असं मत एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलंय.
राज्य परिहवन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना एसटीचं खासगीकरण करण्याच्या संदर्भातील वृत्त समोर आलं. एसटी महामंडळाचं खरंच खासगीकरण होणार का? असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत होता. यावर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्याचा विचार नाहीये मात्र, तेो एक पर्याय आहे असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे.
एसटी महामडंळाचं राज्य शासनात विलिगीकरण करण्यात यावं अशी मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या विलिगीकरणाच्या निर्णयावर समितीच निर्णय घेईल असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.त्यांनी पुढे म्हटलं, चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना एसटी कर्मचारी युनियनचे ऐकतायत ना भाजप नेत्यांचे. आंदोलन नेतृत्वहीन झालंय. कामगारांनी सांगावं कुणाशी बोलावे, त्यांच्याशी बोलायला मी तयार आहे. वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतोय. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जातोय.
आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसताना परिवहन महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून एक विनंती केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात चित्रा वाघ यांनी म्हटलं, "आपल्याला माहित आहे की, एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत."
आपल्या पत्रात त्यांनी पुढे म्हटलं, "दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्त्ही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते.
No comments:
Post a Comment